ठाण्यात राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला होणार हनुमान चालिसा पठण

145

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १४ जून आणि शर्मिला राज ठाकरे यांच्या ८ जून या दोन्ही वाढदिवसाचे औचित्य साधून ठाणे मनसेतर्फे सप्ताहभर विविध मनोरंजनात्मक तसेच स्पर्धात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, राज ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला म्हणजेच १३ जून रोजी ठाण्यात हनुमान चालिसा पुस्तिकेचे वाटप आणि पठणाचे कार्यक्रम होणार आहेत. मनसेचे ठाणे व पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तमाम महाराष्ट्र सैनिकांकडून आपल्या दैवताला अनोख्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.

जून महिन्याच्या ८ तारखेला शर्मिला ठाकरे तर १४ जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. याच वाढदिवसानिमित्त राज्यभर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने विविध समाजोपयोगी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे ठाणे शहर जिल्ह्याच्यावतीने सप्ताहरुपी विविध कार्यक्रमाचे आयोजन शहराच्या विविध भागात करण्यात आले आहे.

( हेही वाचा :विधानपरिषदेसाठी भाजपची यादी जाहीर; या नव्या चेह-यांना संधी, तर पंकजा मुंडेंना पुन्हा एकदा डावलले )

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

  • ८ जून (बुधवार) – महिला आरोग्य शिबीर आणि पाककला स्पर्धा
  • ९ जून (गुरुवार) – जेष्ठ नागरिक कलागौरव
  • १० जून (शुक्रवार) -जेष्ठ नागरिकांना बुस्टर डोस
  • ११ जून (शनिवार)भजन स्पर्धा
  • १२ जून (रविवार) रोजगार मेळावा
  • १३ जून (सोमवार) हनुमान चालिसा पठण आणि वाटप
  • १४ जून (मंगळवार) महाआरती आणि प्रसाद वाटप
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.