निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

103
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाच्या याचिकेवर ३१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात येत्या ३१ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या आदेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यांची याचिका येत्या ३१ तारखेला सूचीबद्ध करू, असे कोर्टाने म्हटले आहे.

(हेही वाचा – Heavy Rain : हिमाचल-उत्तराखंडमध्ये नद्यांना पूर; IMD कडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा)

एकनाथ शिंदे व त्यांच्या सहकारी आमदारांनी गतवर्षी शिवसेनेशी बंडखोरी केली होती. कालांतराने त्यांच्या गटाला निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव व निवडूक चिन्हही दिले होते. आयोगाच्या या निर्णयाला ठाकरेंनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. त्यात त्यांनी शिंदे गटाच्या आमदारांचा अपात्रतेचा निर्णय निकाली निघेपर्यंत आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली होती. तसेच पक्षातील बहुतांश सदस्य आमच्या बाजूने असूनही आयोगाने शिंदेंना नाव व पक्षचिन्ह बहाल करण्याचा निर्णय चुकीचा होता, असा दावाही त्यांनी या याचिकेद्वारे केला आहे. त्यांच्या या याचिकेवर येत्या ३१ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे ठाकरे विरुद्ध शिंदे वादाला नव्याने फोडणी मिळण्याची शक्यता आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.