I.N.D.I. Alliance : नितीशकुमार होणार इंडी आघाडीचे संयोजक

नाराजी दूर करण्यासाठी कॉंग्रेस मांडणार प्रस्ताव

153
Bihar : आमदार 'नॉट रिचेबल'; काँग्रेसचे टेन्शन वाढणार
Bihar : आमदार 'नॉट रिचेबल'; काँग्रेसचे टेन्शन वाढणार

इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांची नाराजी दूर करण्यासाठी पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. यासाठी नितीशकुमार (Nitish Kumar) यांना लवकरच इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) संयोजकपदी बसविले जाण्याची शक्यता आहे. स्वत:चे अस्तित्व टिकविण्यासाठी लोकसभेच्या निवडणुकीत मैदानात उतरणारा कॉंग्रेस पक्ष आता इंडी आघाडीतील (I.N.D.I. Alliance) घटक पक्षांसोबत कोणत्याही प्रकारचा समझोता करायला तयार आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (Nitish Kumar) यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना इंडी आघाडीचे (I.N.D.I. Alliance) संयोजक बनविले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आघाडीच्या पुढील बैठकीत दस्तुरखुद्द कॉंग्रेस हा प्रस्ताव आणणार आहे. (I.N.D.I. Alliance)

महत्वाचे म्हणजे, नुकतीच दिल्लीत झालेल्या इंडी आघाडीच्या (I.N.D.I. Alliance) चौथ्या बैठकीत नितीशकुमार (Nitish Kumar) यांना संयोजक बनविण्याच्या मुद्यावरून कॉंग्रेसने मौन धारण केले होते. परंतु, भाजपशी जवळीक वाढू नये म्हणून कॉंग्रेस आता त्यांना संयोजक बनविण्यास तयार असल्याचे समजते. नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्या नाराजीचा परिणाम इंडी आघाडीवर (I.N.D.I. Alliance) होऊ शकतो अशी भीती कॉंग्रेससह अनेक पक्षांना वाटू लागली. यामुळे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांनी नितीशकुमार (Nitish Kumar) यांना संयोजक बनविण्यावर सहमती दर्शविली असल्याचे समजते. (I.N.D.I. Alliance)

(हेही वाचा – Panvel-Karjat Rail Line : पनवेल-कर्जत रेल्वे मार्गातील अडथळा दूर; न्यायालयाने केला हस्तक्षेप)

लालू प्रसाद यादव नितीशकुमारांवर नाराज?

महत्वाचे म्हणजे, जेडीयू आणि राजदच्या बिहारमधील सरकारमध्ये सुध्दा आलबेल नसल्याची चर्चा आहे. राजदप्रमुख लालू प्रसाद यादव नितीशकुमार (Nitish Kumar) यांच्यावर नाराज असल्याचे समजते. नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना विधानसभा निवडणुकीसाठी चेहरा घोषित करावा, अशी लालू प्रसाद यादव यांची इच्छा आहे. कदाचित म्हणूनच, तेजस्वी यादव यांनी ६ जानेवारीला होणारा त्यांचा ऑस्ट्रेलिया दौरा रद्द केला आहे. परंतु, नितीशकुमार मुख्यमंत्रीपदावर राहून राष्ट्रीय राजकारणात नशिब आजमावू पाहत आहेत. (I.N.D.I. Alliance)

याशिवाय, नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी कॉंग्रेसवरही शरसंधाण साधले होते. बिहार सरकारने जात जनगणना आणि आरक्षणाची मर्यादा वाढविण्याचा ऐतिहासीक निर्णय घेतला आहे. परंतु, कॉंग्रेस पक्ष याचा कुठेही उल्लेख करीत नाही अशी खंत नितीशकुमार (Nitish Kumar) यांनी बोलून दाखविली होती. यानंतर कॉंग्रेस कामाला लागली असल्याचे समजते. विश्वासाच्या अभावामुळे राजद आणि जेडीयू या दोन्ही पक्षातील नाराजीची दरी वाढत चालली आहे. उपमुख्यमंत्री तेजस्वी यांदी गेल्या महिनाभरात अनेक महत्वाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसोबत स्टेज शेअर केलेला नाही. कारण, राजद मुख्यमंत्र्यावर नाराज आहे. नितीशकुमार (Nitish Kumar) आरजेडीवर भ्रष्टाचारासाठी राजदला जबाबदार धरत आहेत ही बाब राजदला टोचत आहे. (I.N.D.I. Alliance)

बिहारच्या राजकारणाला नवे वळण मिळू शकते

जेडीयू-आरजेडीमध्ये ज्याप्रकारे तणाव वाढला वाढला आहे, त्यामुळे बिहारच्या राजकारणाला नवे वळण मिळू शकते. सध्याच्या राजकीय समीकरणाबाबत बोलायचे झाले तर राजदला काँग्रेस आणि डाव्या पक्षांसह ११४ आमदारांचा पाठिंबा आहे. बहुमतासाठी आठ आमदारांची गरज आहे. जेडीयूचे ४३ तर भाजपचे ७४ आमदार आहेत. बिहारची विधानसभा २४३ सदस्यांची आहे, हे येथे उल्लेखनीय. (I.N.D.I. Alliance)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.