Nitin Gadkari : १-१ किलो सावजीचे मटण वाटूनही निवडणूक हरलो; नितीन गडकरींनी सांगितला निवडणुकीचा अनुभव 

104

लोक पोस्टर्स लावून, खाऊ-पिऊ घालून निवडणुका जिंकतात, यावर माझा विश्वास नाही. मी अनेक निवडणुका लढवल्या आहेत. मी सर्व प्रयोग करून चुकलो आहे. एकदा निवडणुकीत तर एक-एक किलो सावजीचे मटण घरी पोहोचवण्याचेही काम झाले. पण आम्ही निवडणूक हरलो. लोक हुशार आहेत, लोक म्हणतात, जे देत आहेत ते ठेवूनघ्या. आपल्याच बापाचा माल आहे. मात्र मत त्यालाच देतात. ज्यांना त्यांना द्यायचे आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांचा निवडणूक लढवण्याचा अनुभव सांगितला.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. जेव्हा आपण आपल्या लोकांमध्ये विश्वास निर्माण करता, तेव्हाच ते आपल्यावर विश्वास ठेवतात. त्याला कुठल्याही पोस्टर बॅनरची आवश्यकता लागत नाही. अशा मतदारांना, कुठल्याही प्रकारची आमिषं दाखविण्याची आवश्यकता नसते. कारण त्याला आपल्यावर विश्वास असतो आणि हा लाँग टर्न आहे, याला कुठलाही शॉर्टकट नाही. लोक म्हणतात,  MP चे तिकीट द्या. नाही तर MLA चे तरी तिकीट द्या. नाही तर MLC तरी बनवा. हे नसेल तर आयोग तरी द्या. यांपैकी काहीच नाही, तर मेडिकल कॉलेज द्या. मेडिकल कॉलेज नाही तर, इंजिनिअरिंग कॉलेज किंवा Bed कॉलेज तरी द्या. हीही शक्य नसेल, तर प्रायमरी स्कूल तरी द्या. यातून शिक्षकांचा अर्धा पगार आम्हाला मिळेल. मात्र याने देश बदलत नाही, असेही मंत्री गडकरी म्हणाले.

(हेही वाचा Ajmer Kand : चित्रपट प्रदर्शित करू दिला नाही, तर ‘यु-ट्यूब’वर करू ! – दिग्दर्शक सचिन कदम)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.