Nitesh Rane : संजय राऊत म्हणजे दुतोंडी साप, नीतेश राणे यांचा हल्लाबोल

भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तिथे त्यांची सभा होणार आहे. यावर नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

77
Nitesh Rane: स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका कर, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
Nitesh Rane: स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका कर, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

संजय राऊत म्हणजे दुतोंडी साप, असे म्हणत आमदार नीतेश राणे यांनी संजय राऊतांवर टीका केली आहे. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा सुटणार कधी? याबाबत संजय राऊत यांनी अनेक तारखा दिल्या. पण यांची भांडणं कमी होत नाहीत. मतदानानंतरदेखील यांची भांडणं मिटणार नाहीत. केवळ 4 ते 5 जागा देणे म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबाचा फार मोठा अपमान आहे. शाहू महाराजांच्या घरात शकुनी मामाने सुरुंग लावला का? याबाबत शाहू महाराज यांचे मत फार महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले. (Nitesh Rane)

दरम्यान आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) पुढे बोलताना म्हणाले की, 2019 पर्यंत त्यांनीसुद्धा मोदी परिवाराचा फायदा घेतला आहे. मनात बेईमानी आल्यामुळे आम्ही परिवार नाही असे सांगून वेगळे झालो. संजय राऊतांचा मालक मुख्यमंत्री असताना महाराष्ट्र राज्यातील जनतेला उद्धव ठाकरेंनी आपला परिवार मानला का? पाटणकर परिवार सोडून दुसऱ्या कोणाला परिवार मानले का?, असा सवाल नीतेश राणे यांनी केला आहे.

(हेही वाचा – Hamas Israel War: इस्रायलवर केलेल्या अँटी टॅंक मिसाइल हल्ल्यात एका भारतीयाचा मृत्यू, २ जण जखमी)

राऊतांचा परिवार कोणता?
दरम्यान, दिशा सालीयन केसमधून माझ्या मुलाला वाचवा अस सांगत आहेत, अशी टीका करत असताना संजय राऊत यांना लाज वाटली पाहिजे. नेमका संजय राऊतांचा परिवार कोणता? भारतीय आहे की रशियात आहे? मणिपूरविषयी बोलण्यापूर्वी पत्राचाळमधील माणसांना आपला परिवार माना, असा घणाघात नीतेश राणे यांनी केला आहे.

शहाच्या दौऱ्यावर आम्हाला बळकटी मिळेल
भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा मंगळवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत. तिथे त्यांची सभा होणार आहे. यावर नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात कोणाला कसा न्याय द्यायचा? हे अमित शहा यांना माहित आहे. त्यांच्या दौऱ्यामुळे आम्हाला बळकटी मिळेल. दूरदृष्टी असणारा नेता आम्हाला विश्वास आहे. ज्या अडचणी आहेत. त्या दूर होतील, असे नीतेश राणे म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.