Nitesh Rane: स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका कर, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

113
Nitesh Rane: स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका कर, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा
Nitesh Rane: स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका कर, नितेश राणेंचा संजय राऊतांना इशारा

ढबु पैसा हा स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी सुरू केलेले नाणे. त्याचे महत्त्व औरंग्याचा वंशज असलेल्या संजय राऊतला कळणार नाही. आमच्या बावनकुळे साहेबांवर बोलण्याची हिंमत उद्धव ठाकरेंच्या कामगाराने करू नये. तुझ्या मालकाच्या नाण्याची किंमत समाजात राहिलेली नाही. पहिले स्वतःची आणि मालकाची बाजारातील किंमत समजून घे आणि मग टीका कर, असा इशारा भाजप प्रवक्ते आमदार नितेश राणे यांनी दिला. कणकवलीत प्रहार भवन येथे ते पत्रकारांशी बोलत होते. (Nitesh Rane)

तुमच्यासारखी इटालियन नाण्यासमोर आम्ही लाळ चाटत नाही. पाय चाटत नाही. चाटून चाटून तुमच्या जिभेला हाड राहिलेलं नाही. ती जीभ कमी वळवळेल तेवढा कमी त्रास तुला आणि तुझ्या मालकाला होईल. पंतप्रधानांवर टीका करण्यापूर्वी आपली लायकी ओळखा असेही राऊत यांना सुनावले.

खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) म्हणले, तुझ्या मालकाची शोले चित्रपटामधील असराणीसारखी अवस्था आहे. मालकासोबत काही उरलेले नाही. दुसऱ्यांवर टीका करण्यापूर्वी मालकाची अवस्था बघ. सिल्वर ओकची उबाठा नेमके काय आहे. याचे विश्लेषण आम्ही करायचे का ? हाताला गजरा लाऊन उबठाचा नंगा नाच कसा पहिला जातो ते दाखवायचे का? असा सवाल त्यांनी केला.

नरेंद्र मोदी यांचा ‘२०००ची बंद पडलेली नोट’ असा उल्लेख राऊतने केला. ह्याचा मालक आता बंद पडत चालला आहे. मोदी साहेबांमुळे तुझ्या मालकांचे १८ खासदार निवडून आले, याचा विचार कर आणि मग बोल. इंडिया आघाडी मुस्लिम लीगचे पिल्लू आहे का ? ह्याचे उत्तर द्या आणि मग आमच्यावर टीका करा. उद्धव ठाकरे यांचा कोणता नातेवाईक अमित शहा यांच्या घराबाहेर असतो याची माहिती प्रकाश आंबेडकर यांना असेल म्हणून ते घाबरले. प्रकाश आंबेडकर यांनी मोदींचे नाव घेतले नाही तर त्यांच्या सभेला कोणी येणार नाही. सभेत गर्दी करण्यासाठी असे बोलावे लागते, असे आमदार नितेश राणे म्हणाले.

(हेही वाचा – Mary Kom : मेरी कोमने पॅरिस ऑलिम्पिक पथकाची ‘शेफ द मिशन’ व्हायला नकार का दिला? )

उमेदवारीबद्दल बोलताना आमदार नितेश राणे म्हणाले, तुमच्या मनात संभ्रम आहे. आमच्यात नाही. आम्ही सगळे जण महायुती म्हणून कामाला लागलेलो आहोत. ६० टक्के काम पूर्ण झालं आहे. लोकांच्या मनातला उमेदवार समजा, असेही त्यानी एका प्रश्नाच्या उत्तरावेळी सांगितले.

आचार संहितेचा भंग वाटत असेल तर तक्रार करा !
तुम्हाला माझे वक्तव्य आचार संहितेचा भंग वाटले तर तक्रार करावी. मी अधिकारवाणीने माझ्या कार्यकर्त्यांशी बोललो. माझ्या सरपंचांना वाईट वाटले नाही. संपलेल्या व व्हेंटिलेटरवर असलेल्या खासदारांनी त्याबाबत बोलू नये. माझी कामाची पद्धत जशी आहे तसे मी ABCअसे ग्रुप करून निधी देणार असेही ते म्हणाले. राऊत यानी स्वतःच्या सरपंचांना किती निधी दिला. त्यांना विकास करण्यासाठी कसा न्याय दिला, ते मांडावे. मी माझ्या विचारांच्या सरपंचांना कसा आणि किती निधी दिला ते सांगतो. त्यामुळे विनायक राऊत यांना त्याच्या प्रश्नांची उत्तरे ४ जूनला मिळतील. आमच्या घरात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा तुमचे मतदार खळा बैठकीला का येत नाहीत. याचा विचार करा. किमान ५ लाख मतांनी पराभवाची तयारी ठेवा. विनायक राऊतला पाडण्यासाठी आम्ही तयार आहोत. कोण कोणाला घाबरतो ते लवकरच समजेल.

ठाकरेंची कणकवलीत सभा म्हणजे आम्हाला जास्त मतदान !
जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंनी माझ्या कणकवलीत येऊन सभा घेतली तेव्हा मला जास्त मतदान झाले आहे. २०१९ मध्ये सभा घेतली तेव्हा २०१४ च्या तुलनेत मतदान वाढले. मला जेवढे जास्त विरोधक शिव्या घालतील तेव्हढी जास्त मते मिळतात त्यामुळे या तुमचं स्वागत आहे. असे आमदार नितेश राणे म्हणाले.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.