Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला राजीनामा

पवार यांनी लोक भावनेचा आदर करावा, आणि आपला निर्णय मागे घ्यावा, देशाला त्यांची गरज आहे, तुम्ही भीष्म पितामह आहात

184
Jitendra Awhad
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बुधवार ३ मे रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी नाट्यमय घडामोडीत अध्यक्षपद सोडण्याची घोषणा केल्यानंतर आव्हाड यांनी हा निर्णय घेतला आहे. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी आव्हाड यांनी केली आहे.

(हेही वाचा – Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या हातात राष्ट्रवादीची सत्ता येणार?)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मंगळवारी “लोक माझे सांगाती” या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशनावेळी पक्षाचे प्रमुखपद सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर शरद पवार यांच्या निवासस्थानी पक्षाच्या नेत्यांच्या समितीची बैठक झाली. त्यानंतर अजित पवार यांनी सांगितले की, शरद पवार यांना आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी दोन-तीन दिवसांची वेळ हवी आहे, त्यामुळे आता पवार काय निर्णय घेतात, याबाबत उत्सुकता आहे. परंतु, पवारांनी आपला निर्णय बदलावा ही मागणी लावून धरत पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. अशातच बुधवारी पक्षाचे सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राजीनामा सादर केला असून त्यांच्या पाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील इतर पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामे सादर केले आहेत.

हेही पहा

यासदंर्भात आव्हाड (Jitendra Awhad) यांनी सांगितले की, ठाण्यामध्ये जिल्हा पातळीवर देखील अनेक पदाधिकारी राजीनामे देत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील सर्वच पदाधिकारी यांनी राजीनामे आज दिले आहेत. पवार यांनी लोक भावनेचा आदर करावा, आणि आपला निर्णय मागे घ्यावा, देशाला त्यांची गरज आहे, तुम्ही भीष्म पितामह आहात त्यामुळे आपला राजीनामा मागे घ्यावा, आमची लढाई ही तुम्ही असल्यामुळे लढत आहेत, त्यांच्यावर विश्वास होता म्हणून आम्ही लढाई लढत राहत होतो. त्यामुळे निर्णय मागे घ्यावा असे आव्हाड यांनी सांगितले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.