Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या हातात राष्ट्रवादीची सत्ता येणार?

शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र नेमकी कोणाच्या हातात जाणार यावर चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार, सुप्रिया सुळे, (Supriya Sule) जयंत पवार आणि प्रफुल्ल पटेल या चार नावांची चर्चा

207
Supriya Sule
Supriya Sule : सुप्रिया सुळे यांच्या हातात राष्ट्रवादीची सत्ता येणार?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मंगळवारी, २ मेला त्यांच्या राजकीय जीवनाबाबत मोठी घोषणा केली. ‘मी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार’ असल्याचे शरद पवारांनी यांनी जाहीर केले. ‘लोक माझे सांगाती राजकीय आत्मकथा’ या पुस्तक प्रकाशनावेळी शरद पवारांनी निवृत्त होण्याची घोषणा केली. याबाबत कोणतीही पुर्वकल्पना नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धक्काच बसला. त्यांनी यावेळी शरद पवारांना निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची भावनिक साद घातली. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादीची समिती निवृत्ती निर्णयाबाबत जे काही ठरवले ते मला मान्य असल्याचा निरोप शरद पवारांनी अजित पवारांना दिला. त्यानुसार अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्यांनतर दोन ते तीन दिवसांमध्ये पुन्हा एकदा विचार करून अंतिम निर्णय घेईन असे शरद पवार यांनी सांगितले.

(हेही वाचा – Sharad Pawar Resigns: शरद पवारांच्या निवृत्तीला कोणाचा विरोध आणि कोणाचे समर्थन)

शरद पवार यांनी अचानक निवृत्ती जाहीर केल्याने आता राष्ट्रवादीची सत्ता कोणाच्या हातात जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अशातच राष्ट्रवादीच्या गटातून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दादांना डावलून ताईच्या हाती सत्ता?

शरद पवार यांच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सूत्र नेमकी कोणाच्या हातात जाणार यावर चर्चा रंगल्या होत्या. अजित पवार, सुप्रिया सुळे, (Supriya Sule) जयंत पवार आणि प्रफुल्ल पटेल या चार नावांची चर्चा रंगली असतांना बुधवार सकाळपासून सुप्रिया सुळे या नावाची चर्चा अधिक रंगू लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शरद पवार आणि अजित पवार यांच्यात या विषयावरून चर्चा झाली आहे. त्यामुळे आजच म्हणजेच बुधवार ३ मे २०२३ रोजीच सुप्रिया ताई यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का, की ही अध्यक्षपदाची शर्यंत आणखी कोणते नवे वळण घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही पहा – 

तर दुसरीकडे केंद्रात सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि राज्यात अजित पवार अशा समीकरणांची चर्चा देखील पाहायला मिळत आहे.

या सर्व मुद्द्यांवर यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बुधवार ३ मे रोजी सकाळी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांची बैठक आहे. या बैठकीनंतर सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Supriya Sule)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.