एका शब्दाने पेटलं महाराष्ट्राचं राजकारण; मंत्रालयासमोर राष्ट्रवादीची Congress कडे जाहीर माफीची मागणी

84
एका शब्दाने पेटलं महाराष्ट्राचं राजकारण; मंत्रालयासमोर राष्ट्रवादीची Congress कडे जाहीर माफीची मागणी
एका शब्दाने पेटलं महाराष्ट्राचं राजकारण; मंत्रालयासमोर राष्ट्रवादीची Congress कडे जाहीर माफीची मागणी
  • विशेष प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्याबाबत करण्यात आलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबईसह राज्यभर आंदोलनाची भूमिका घेतली असून, मंत्रालयासमोर करण्यात आलेल्या मूक आंदोलनाने या वादाला नवे वळण मिळाले आहे.

मुंबईतील मंत्रालयालगत गांधी यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले. पोलिसांनी या आंदोलनाला परवानगी दिली नसल्याचे सांगितले जात असतानाही कार्यकर्त्यांनी शांततापूर्ण मूक आंदोलन करत काँग्रेसने (Congress) सार्वजनिकरित्या माफी मागावी, अशी ठाम मागणी केली.

आंदोलनादरम्यान घोषणांनी मंत्रालय परिसर दणाणून गेला. “गुंगी नहीं, आँधी है… आँधी नहीं, तूफान है”, “सुनेत्रा वहिनी आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं” अशा घोषणांमधून कार्यकर्त्यांनी आपल्या नेतृत्वावरील विश्वास व्यक्त केला. अनेक कार्यकर्त्यांनी गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन करून काँग्रेसला (Congress) सद्बुद्धी मिळावी, अशी प्रतीकात्मक प्रार्थनाही केली.

(हेही वाचा – Ganeshotsav 2026: पीओपी मूर्तीप्रकरणी हायकोर्टात अर्ज दाखल, पंतप्रधानांच्या भूमिकेबाबत न्यायालयाचा सरकारला खरमरीत सवाल)

दरम्यान, या आंदोलनात राष्ट्रवादीच्या नेत्या सना मलिक (Sana Malik) यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. काँग्रेसने केलेल्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी तातडीने जाहीर माफीची मागणी केली. संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार शांततापूर्ण आंदोलन करण्यात येत असून कायदा हातात घेण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण वादाची सुरुवात काँग्रेसकडून सुनेत्रा पवार यांच्याबाबत करण्यात आलेल्या ‘गुंगी गुडिया’ या उल्लेखानंतर झाली. या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत राज्यभर निषेध आंदोलन सुरू केले आहे. नाशिक, पुणे, मुंबईसह विविध जिल्ह्यांमध्ये पक्षाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले असून काँग्रेसने बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे.

या प्रकरणामुळे महाविकास आघाडीतील राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून, येत्या काही दिवसांत या वादाचे पडसाद आणखी उमटण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.