सत्तारांच्या विधानावरुन सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया! म्हणाल्या, ‘एका मंत्र्याकडून…’

83

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून सत्तारांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण याचबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

सगळेच तारतम्य पाळतात असं नाही

महाराष्ट्राच्या एका मंत्र्याकडून काही अपशब्द वापरले गेले,याची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात उमटली. कारण अशा प्रकारची वक्तव्ये ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. असं बोलणं-वागणं ही आपली परंपरा नाही. अशा प्रकारची वक्तव्ये सत्तेच्या केंद्रस्थानी बसलेल्या लोकांकडून अपेक्षित नसतात. परंतु सगळेच तारतम्य पाळतात असे नाही. जरी त्यांनी काही तारतम्य पाळले नाही तरी ज्या पद्धतीने विविध संस्था, व्यक्ती, माध्यमातून याबाबत प्रतिक्रिया आल्या, संवेदना व्यक्त केल्या गेल्या ही बाब आश्वासक आहे. तिची नोंद घेणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दिली आहे.

(हेही वाचाः ‘त्यावेळी चाकणकरांनी माझा फोन उचलला नाही’, सत्तारांवरील कारवाईनंतर अंधारेंची नाराजी)

महाराष्ट्राच्या संस्कृतीचे जतन करूया

मला आवर्जून असे सांगायचे आहे की, जर कुणी चुकीचे बोलले असेल, त्यांनी महिलांचा सन्मान जपला नसेल म्हणून आपण अस्वस्थ होणं स्वाभाविक असलं तरी आपण या सगळ्या प्रवृत्ती बाजूला टाकूयात आणि महाराष्ट्राची जी सुसंस्कृत परंपरा आहे, ती जतन करुया. याप्रसंगी राज्यातील विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी, जाणकारांनी समंजसपणाची भूमिका दाखवून महाराष्ट्र हा ‘सुसंस्कृतच महाराष्ट्र’ आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित केले याबद्दल मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आहेत.

(हेही वाचाः ‘महिलांच्या अस्मितेबाबत सिलेक्टिव्हपणा नको’, चित्रा वाघ यांची सत्तारांच्या विधानावरुन प्रतिक्रिया)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.