मलिकांना दणका! कोठडीतील मुक्काम आणखी वाढला

105

मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली असून मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या मलिकांच्या न्यायालयीन कोठडीत आणखी चार दिवस म्हणजेच २२ एप्रिलपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी मलिकांना देण्यात आलेली त्यांची कोठडी सोमवारी संपत असल्याने त्यांना मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने कोठडी सुनावली. मनी लॉंड्रिग प्रकरणात मलिक यांना ईडीनं अटक केली होती. सध्या ते ऑर्थर रोड तुरुंगात आहेत.

(हेही वाचा – गृहमंत्र्यांच्या निर्णयाचे मोहित कंबोज यांच्याकडून स्वागत, म्हणाले… )

न्यायालयात काय घडले?

नवाब मलिकांची न्यायालयीन कोठडी संपत असल्याने त्यांना आज पुन्हा एकदा मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, मलिक यांनी आपल्या तातडीच्या सुटकेसाठी आणि ईडीच्या कारवाईविरोधात सर्वेच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली अटक ही बेकयदा असल्याचा दावा त्यांनी या याचिकेतून केला आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

ईडीकडून पुन्हा कोठडी देण्याची मागणी 

नवाब मलिकांवर कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमची बहिण हसिना पार्करसंबंधित मालमत्तांशी आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप आहेत. यावरून त्यांचे नाव दाऊद इब्राहिमशीदेखील विरोधकांनी जोडले आहे. या प्रकरणात ईडीने त्यांना अटक केली होती. ईडी कोठडीनंतर मलिक आता ऑर्थर रोड येथील न्यायालयीन कोठडीत आहेत. सोमवारी त्यांची न्यायालयीन कोठडी संपल्यामुळे त्यांना ईडीने विशेष न्यायालयात हजर केले होते. सुनावणीदरम्यान याप्रकरणी अधिक चौकशीसाठी मलिक यांची पुन्हा कोठडी देण्याची मागणी ईडीने केली होती. त्याला मंजूर करत ईडीच्या विशेष न्यायालयाने नवाब मलिकांना आता २२ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.