गृहमंत्र्यांच्या निर्णयाचे मोहित कंबोज यांच्याकडून स्वागत, म्हणाले…

93

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे काढण्याबाबत सरकारला अल्टीमेटम दिल्यानंतर भोंग्यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापलं आहे. मंदिर किंवा मशीदवर लाऊडस्पीकर लावण्यासंदर्भातचा निर्णय गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील जाहीर केला आहे. परवानगी असलेल्या लाऊडस्पीकरला डेसिबल मर्यादा ठरवून परवानगी द्यावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. तसेच या निर्णयाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही वळसे-पाटील यांनी दिला. याच निर्णयाचे भाजप नेते मोहित कंबोज यांनी स्वागत केले असून यासंदर्भात एक व्हिडिओदेखील त्यांनी शेअर केला आहे.

काय महणाले मोहित कंबोज?

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सोमवारी मंदिर किंवा मशीदीवरील लाऊडस्पीकर वाजवायचे असल्यास परवानगी घेऊन वाजवावी असा निर्णय घेतला याबाबत त्याचे स्वागत करतो. याचबरोबर येत्या काळात मशिदीवर लाऊड स्पीकर लावण्यासाठी जी नियमावली ठरवणार आहात तीच नियमावली मंदिराच्या लाऊडस्पीकर बाबत ठरवावी अशी विनंतीही केली. ते पुढे असेही म्हणाले, ज्या मशिदीवर अनधिकृत लाऊड स्पीकर आहेत त्यांना परवानगी देऊ नये. तसेच मदरशांवरील लाऊडस्पीकर देखील काढून टाकावेत. कारण ८० टक्के लाऊडस्पीकर हे मदरशांवर लावलेले आहेत. तर २० टक्के लाऊड स्पीकर हे मशिदीवर आहेत असेही ते म्हणाले.

(हेही वाचा – येत्या एक-दोन दिवसांत भोंग्याच्या वापरावरील गाईडलाईन्स येणार)

महाराष्ट्र सरकारला विनंती करताना ते म्हणाले, सर्वोच्च न्ययालयाचे नियम सरकारने योग्य रीतीने राबवावे. ध्वनी प्रदूषण ही एक खूप मोठी समस्या आहे. येत्या काळात मशिदीवरील अनधिकृत भोंगे उतरवावे. याची सुरुवात ही मुंबईवरून व्हावी जेणेकरून देशाला दिशा मिळेल.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.