NCP Hearing : अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही; शरद पवार गटाचा अजित पवार गटाला प्रश्न

NCP Hearing : शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नॉमिनेशन अर्जावर अजित पवारांची सही असल्याकडे राष्ट्रवादीचे वकील देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगाचे लक्ष वेधले.

63
NCP Hearing : मग तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही; शरद पवार गटाचा अजित पवार गटाला प्रश्न
NCP Hearing : मग तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही; शरद पवार गटाचा अजित पवार गटाला प्रश्न

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवला, तर तुम्ही अध्यक्षपदाची निवडणूक का लढली नाही ?,असा प्रश्न विचारत वकील देवदत्त कामत यांनी अजित पवार (Ajit Pawar) गटाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (Nationalist Congress Party) नेमका कुणाचा’ याबाबत निवडणूक आयोगात (Election Commission of India) सुनावणी सुरू आहे. या वेळी शरद पवार यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या हुकूमशाहीच्या आरोपांचे जाेरदार खंडण करण्यात आले. ‘शरद पवार (Sharad Pawar) हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवत होते, तर तुम्ही पक्षांतर्गत निवडणूक का लढवली नाही’, असा प्रतिप्रश्न करण्यात आला. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या नॉमिनेशन अर्जावर अजित पवारांची सही असल्याकडेही राष्ट्रवादीचे वकील देवदत्त कामत यांनी आयोगाचे लक्ष वेधले.

(हेही वाचा – MLA Disqualification Case : जेठमलानींच्या ‘या’ प्रश्नामुळे सुनील प्रभूंनी बदलली साक्ष)

… तेव्हा आक्षेप का घेतला नाही ?

निवडणूक आयोगात बाजू मांडण्यासाठी (Sharad Pawar) शरद पवार गटाचा हा शेवटचा दिवस होता. या वेळी त्यांचे वकील कामत यांनी पवारांवरील आरोपांचे खंडन केले. तसेच प्रतिप्रश्न उपस्थित करून अजित पवार गटाची कोंडी केली आहे. सुनावणीदरम्यान कामत म्हणाले, ”राष्ट्रीय अध्यक्ष पदाची निवड झाली, त्या वेळी अजित पवार (Ajit Pawar) तेथेच होते. त्या वेळी त्यांनी पवारांच्या मनमानी कारभारावर आक्षेप का घेतला नाही ? तसेच पवारांच्या निवडीवर आक्षेप होता, तर त्यांनी निवडणूक का लढली नाही ?”, असे प्रश्न अजित पवार गटाला केले आहेत.

पक्षांतर्गत निवडणूक का घेतली नाही ?

शरद पवारांवर (Sharad Pawar) हुकूमशाहा पद्धतीने पक्ष चालवण्याचा आरोप केला होता. यावर युक्तीवाद करताना कामतांनी, ”हुकुमशाही पद्धतीने पक्ष चालवला जात होता, तर त्याचवेळी पक्षांतर्गत निवडणूक का घेतली नाही ? उलट अध्यक्ष म्हणून पवारांच्या नॉमिनेशन अर्जावर अजित पवारांचीच सही आहे. तसेच पवारांच्या अध्यक्ष म्हणून निवडीवर गाव, तालुका अशा कुठल्याही स्तरावरून आक्षेप नोंदवला गेला नाही. ‘त्यांची निवड चुकीची आहे’, असेही म्हटलेले नाही. त्यामुळे अजित पवार गटाने उपस्थित केलेला दावाच मुळात चुकीचा आहे,’ असेही कामत यांनी म्हटले. (NCP Hearing)

(हेही वाचा – Droupadi Murmu : राज्यपालांनी केले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे पुणे विमानतळावर स्वागत)

खोटी कागदपत्रे दिल्याचा अजित पवार गटावर आरोप

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अजित पवार (Ajit Pawar) गटावर गंभीर आरोप केले आहे. अजित पवार गटाने खोटी कागदपत्रे सादर केली आहेत. राष्ट्रीय कार्यकारणीतील सहभागी सदस्यांची दिलेली माहिती खोटी असल्याचा आरोप करण्यात आले आहेत. परिणामी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुनावणीत ट्विस्ट आला आहे. (NCP Hearing)

आता राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगण्यासाठी गुरुवारपासून अजित पवार गट भूमिका मांडणार आहे. या सुनावणीकडे (NCP Hearing) राज्याचे लक्ष आहे. अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन शरद पवारांवर (Sharad Pawar) हुकूमशाही पद्धतीने पक्ष चालवण्याचा आरोप केला होता.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.