NCP Crisis : साहेब वय झालं, कधी थांबणार? अजित पवार यांचा शरद पवारांना थेट सवाल

147
NCP Crisis : साहेब वय झालं, कधी थांबणार? अजित पवार यांचा शरद पवारांना सवाल

“आता तुमचे वय झाले, तुम्ही थांबणार आहात की नाही? असा थेट सवाल विचारत अजित पवार यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार बुधवारी (५ जुलै) वांद्रे येथील एमईटी येथील पक्षाच्या बैठकीत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडून अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून राष्ट्रवादी पक्षावर नेमका कोणाचा अधिकार असा प्रश्न उपस्थित झाला. त्यावर आजच्या बैठकीतून उत्तर मिळणार आहे. अजित पवारांच्या बैठकीला आतापर्यंत ३२ आमदारांनी उपस्थिती लावली आहे. यावेळी एमईटीमध्ये अनेकांनी भाषणे केली. स्वतः अजित पवार यांनी भाषण करून सर्वांना संबोधित केलं. यावेळी बोलतांना अजित पवार यांनी थेट शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

(हेही वाचा – NCP Crisis : आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला,पण कधी … – धनंजय मुंडे)

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण करत आहात, आता वय झालं. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे. तुम्ही थांबणार आहात की नाही? साहेब आमचे श्रद्धास्थान आहे. पण नवीन नेतृत्वाला संधी मिळायला पाहिजे. त्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा. मी राजकीय जीवनामध्ये काम करत असताना साहेबांच्या छत्रछायेखाली आणि मार्गदर्शनाखाली तयार झालो. घडलेलो आहे. त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तीळमात्र शंका नाही. साहेब आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान आहेत. त्याबद्दल आमच्या प्रत्येकाचे तेच मत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.