Naxal Attack: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, आठ नक्षलवादी ठार

142
Naxal Attack: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, आठ नक्षलवादी ठार
Naxal Attack: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, आठ नक्षलवादी ठार

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. गडचिरोली कोरचोली चकमकीत आतापर्यंत आठ नक्षलवादी (Naxal Attack) ठार झाल्याची माहिती मिळते आहे. चकमक स्थळावरून आठ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. डीआरजी, सीआरपीएफ कोब्रा आणि बस्तर बटालियनच्या जवानांमध्ये अजूनही चकमक सुरू आहे. मंगळवारी सकाळी 6 वाजल्यापासून नक्षलवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू आहे. (Naxal Attack)चकमकीत अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आल्याची माहिती मिळते आहे. दुसरीकडे बिजापूर पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली आहे. या चकमकीत चार नक्षलवादी ठार झाल्याची बातमी आहे. गडचिरोली पोलिसांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नक्षल विरोधी अभियान तीव्र करण्यात आलं आहे. (Naxal Attack)

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया

गांगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि लेंद्राच्या जंगलात चकमक सुरू आहे. घटनास्थळावरून INSAS, LMG, AK47 सारखी स्वयंचलित शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. पोलीस दल अजूनही जंगलात असून परिसरात शोध सुरू आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही. शुक्रवारी रात्री मिळालेल्या सुत्रांच्या माहितीनुसार, कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र कॅडर मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील चुटीनटोला गावाजवळ (एसपीएस पेंढरीपासून 12 किमी पूर्वेला) MH CG बॉर्डरवर तळ ठोकून असल्याची माहिती मिळाली होती. आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी त्यांची रणनीती असल्याचं समोर आलं. यानंतर पोलीस आणि जवानांनी नक्षलविरोधी सर्च ऑपरेशन सुरु केलं. (Naxal Attack)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024: मुंबईच्या उत्तर-पश्चिम मतदारसंघातून शरद पोंक्षे यांच्या नावाची चर्चा)

अतिरिक्त पोलीस अधीक्षक ऑपरेशन्स यतीश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सी60 युनिट्सच्या नक्षलविरोधी ऑपरेशन (Naxal Attack) सुरू करण्यात आलं. शनिवारी ते 450 मीटर उंच टेकडीवर पोहोचले जिथून नक्षलवादी नुकतेच निघाले होते. डोंगरमाथ्यावरील शोधाच्या ठिकाणी एक मोठं आश्रयस्थान आणि नक्षल छावणी सापडली, ही नक्षलवादी छावणी नष्ट करण्यात आली आणि सर्च ऑपरेशन राबवण्यात आलं. मात्र, जंगल आणि उंच टेकड्यांचा फायदा घेत नक्षलवादी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांकडून या भागात शोधकार्य सुरु आहे. (Naxal Attack)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.