Nawab Malik : नवाब मलिकांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर

मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत.

111
Nawab Malik : नवाब मलिकांना वैद्यकीय कारणास्तव दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर

मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात महाराष्ट्राचे माजी मंत्री नवाब मलिक(Nawab Malik) यांना वैद्यकीय कारणास्तव सर्वोच्च न्यायालयाने(High court) दोन महिन्यांसाठी जामीन मंजूर केला. मात्र वैद्यकीय कारणास्तव(medical reason) जामीन देण्यास ईडीनेही हरकत घेतली नाही. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटक झाल्यापासून मलिक तुरुंगात आहे.
महाविकास आघाडी सत्तेत असतानाच मलिक कारागृहात गेले होते. त्यावेळी ते सातत्याने भाजपवर टीका करत होते. तसेच भाजपने देखील मलिक यांना अनेकदा देशद्रोही म्हटलं होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट फुटून सत्तेत गेल्यापासून मलिक यांच्या कारागृहातून बाहेर येण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मलिक शरद पवार गटात जाणार की, अजित पवार हे अनिश्चित आहे.

कशासाठी झाली होती अटक
नवाब मलिक यांना मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईती कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर याच्या चौकशीदरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिकांना ताब्यात घेण्यात आलं. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी अन् गुंड दाऊद इब्राहिम रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉन्ड्रींगच्या माध्यमातून केले जातात. यासंदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने धाडसत्र राबवले होतं. अटक केल्यानंतर त्यांनी अनेकवेळा जामिनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.

(हेही वाचा – Bombay High Court : खड्ड्यांच्या मुद्द्यावरून न्यायालयाने महापालिकेनंतर राज्य सरकारला सुनावले)

काय आहे आजार
नवाब मलिक यांना किडनीचा आजार आहे. त्यांची किडनी निकामी झाली आहे. या आजारावर उपचारासाठी जामीन मिळण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली होती. मलिक हे आजारी असल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात पटवून दिले. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयातील निकालांचा संदर्भ दिला. यामुळे मलिक जामीनासाठी पात्र असल्याचा दावा केला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा हा अर्ज मंजूर करत वैद्यकीय कारणासाठी दोन महिन्यांचा जामीन मंजूर केला

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.