Navneet Rana: उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाने जात प्रमाणपत्र वैध ठरवले

98
Navneet Rana: कॉंग्रेसमुळे सामान्य जनता विकासापासून वंचित, नवनीत राणा यांची टीका

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा (Navneet Rana) गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. दरम्यान सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी झाली आणि अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांना दिलासा मिळाला.

नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी नवनीत राणा यांना दिलासा मिळाल्याची माहिती समोर आली आहे. नवनीत कौर-राणा या चित्रपट अभिनेत्री होत्या. त्यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांच्याशी २०११ मध्ये विवाह केला होता. विवाहनंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळाले होते.

(हेही वाचा – IPL 2024, Suryakumar Yadav : सुर्यकुमार यादव लवकरच मैदानावर परतणार, मुंबईला मोठा दिलासा)

अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा गुरुवारी, (४ एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होत्या. त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयात त्यांच्या जात प्रमाणपत्राबाबत सुनावणी झाली. मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा निकाल दिला होता. तो निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द करत त्यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले. मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने फिरवल्यामुळे नवनीत राणा यांना दिलासा मिळाला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.