Attack By Muslim Mob : पुन्हा पालघर होता होता टळले; नाशिकमध्ये काय घडला भयंकर प्रकार ?

1396
Attack By Muslim Mob : पुन्हा पालघर होता होता टळले; नाशिकमध्ये काय घडला भयंकर प्रकार ?
Attack By Muslim Mob : पुन्हा पालघर होता होता टळले; नाशिकमध्ये काय घडला भयंकर प्रकार ?

‘अखिल भारतीय संत समिति, धर्म समाज’चे महाराष्ट्र प्रमुख आणि महंत पिठाधीश्वर डॉ. अनिकेतशस्त्री महाराज यांच्यावर बुधवारी ३ मार्चला रात्री १ वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समाजाच्या (Attack By Muslim Mob) जमावाने नाशिक हायवेजवळ हल्ला करून त्यांच्या गाडीचे नुकसान केले. अनिकेतशास्त्री महाराज यांनी यासंदर्भात नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला असून राज्य शासनाकडे पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे हा त्यांच्यावर झालेला चौथा हल्ला असल्याचा दावा अनिकेतशास्त्री महाराज यांनी केला आहे.

पालघर साधू हत्याकांडसारखाच (Attack By Muslim Mob) नाशिकरोड (nashik road) येथे करण्याचा प्रयत्न झाल्याची भीती अनिकेतशास्त्री महाराज यांनी व्यक्त केली. चार वर्षांपूर्वी १६ एप्रिल २०२० या दिवशी पालघर (palghar) येथे जमावाकडून (Attack By Muslim Mob)  झालेल्या मारहाणीत २ साधू यांच्यासह अन्य तिघांचा प्राण गेला.

(हेही वाचा – Gaurav Vallabh: काँग्रेस प्रवक्ता गौरव वल्लभ यांचा राजीनामा; देव, देश आणि धर्मासाठी पक्षत्यागाची घोषणा)

कसाबसा जीव वाचवला

‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना अनिकेतशास्त्री महाराज यांनी सांगितले की, “मी मुंबईहून नाशिकला जात असताना उपनगर ते दत्तमंदिर हायवेदरम्यान मुस्लीम समाजातील काही लोकांनी रस्त्यावर उतरून गाड्यांची तोडफोड केली. त्याचप्रमाणे माझ्याही गाडीवर त्यांनी हल्ला केला. गाडीवर लाथा-बुक्क्या आणि काठ्या मारल्या. (Attack By Muslim Mob) यात गाडीच्या काचेचे नुकसान झाले; मात्र कशीबशी एका गल्लीतून गाडी बाहेर काढून आम्ही आमचा जीव वाचवला.” या ठिकाणी जवळपास ९००-१००० चा जमाव असल्याचे महाराजांनी सांगितले.

चौथा प्राणघातक हल्ला

“हा आमच्यावर झालेला चौथा प्राणघातक हल्ला होता. गेल्या काही महिन्यांपासून अनोळखी इसमांकडून आश्रमावर दगडफेक, गोशाळेवर दारूच्या बाटल्या फेकणे, तसेच वारंवार गाडीवर दगडफेक करण्याचे प्रकार करण्यात येत आहेत,” असे अनिकेतशास्त्री महाराज यांनी सांगितले.

पोलीस संरक्षण द्यावे

“याबाबत पोलीस ठाण्यात (police station) गुन्हा दाखल करण्यात आला असला, तरी राज्य शासनाने मला व माझ्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे,” अशी मागणी अनिकेतशास्त्री महाराज यांनी केली आहे. तसेच नाशकतील (Nashik) संतांची सुरक्षा ऐरणीवर असून हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.