पाचव्या फेरीअखेर सत्यजित तांबे विजयी; मविआच्या शुभांगी पाटील पराभूत

104

राज्यात सर्वाधिक चर्चा झालेल्या विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचा निकाल हाती लागला आहे. सर्वात रोमांचक अशा निवडणुकीत सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. महाविकास आघाडीने समर्थन दिल्याने शुभांगी पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. विजय दृष्टीपथात असतानाच सत्यजित तांबेनी जवळच्या व्यक्तीच्या निधनामुळे आंदोत्सव साजरा करणार नसल्याचे जाहीर केले होते.

ताबेंचा दणदणीत विजय

काॅंग्रेसकडून एबी फाॅर्म न मिळाल्याने अपक्ष अर्ज दाखल केलेल्या सत्यजित यांना भारतीय जनता पक्षाने पाठिंबा दिला. तर आधी भाजपकडून प्रतिसाद न मिळाल्याने अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या शुभांगी पाटील यांना ठाकरे गटासोबत महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी पाठिंबा दिला होता. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले होते. त्यानंतर आता निकाल समोर आला आहे. सत्यजीत तांबे यांनी पाचव्या फेरीअखेर एकूण 68 हजार 999 मते मिळवली. तर शुभांगी पाटील यांना फक्त 39 हजार 534 मतांवर समाधान मानावे लागेल. शुभांगी पाटील यांचा तब्बल 29 हजार 465 मतांनी पराभव झाला आहे.

( हेही वाचा: भविष्याचा वेध घेणारा आशावादी अर्थसंकल्प, पण काही गोष्टी नजरेआड करून चालणार नाहीत; डॉ. नरेंद्र जाधव यांचे परखड मत )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.