Sheetal Mhatre Viral Video: किती खाली पडाल रे, नीच हरकती कराल रे.., वरुण सरदेसाईंना टॅग करत नरेश म्हस्केंचं ट्वीट

117

शिवसेनेच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी केला आहे. बदनामी करण्यासाठी हा खोटा व्हिडीओ तयार करण्यात आला असून ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचा यामागे हात असल्याचा आरोपही शीतल म्हात्रे यांनी केला. आता याप्रकरणी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ट्वीट करत थेट युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाईंवर निशाणा साधला आहे.

नरेश म्हस्के यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे की, किती खाली पडाल रे…..नीच हरकती कराल रे… जाणीव नावाची, संस्कारांची, इतिहासाची ठेवाल रे??? माता भगिनी विश्वासावर काम करायला येतात रे, सगळं सांभाळून राजकारणात आपले पाय रोवतात रे… आव्हानांना तोंड देत, यशाचे झेंडे गाडतात रे, त्यांनाच महिला दिनाच्या, शुभेच्छा तुम्ही देता ना रे?? त्यांच्याच चारित्र्यावर मग शिंतोडे उडवता रे?? मातोश्री नावाच्या पेजवरुन, औरंगी हरकती करता रे?? नाव, पत घालवलीतच, कुठे फेडाल ही पापं रे… असे म्हणत नरेश म्हस्केंनी थेट वरुण सरदेसाईंना या ट्वीटमध्ये टॅग केले आहे. त्यामुळे हे ट्वीट पाहून सगळ्यांच्या भुवया उंचावल्या जात आहे. तसेच हे ट्वीट सध्या चांगलेच चर्चेत आले आहे.

(हेही वाचा – शीतल म्हात्रे व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दोघांना अटक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.