Nana Patole:वंचित आणि काँग्रेसमधील धुसफुस वाढली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या

110
Nana Patole:वंचित आणि काँग्रेसमधील धुसफुस वाढली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या
Nana Patole:वंचित आणि काँग्रेसमधील धुसफुस वाढली; आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या

वंचित बहुजन आघाडी (Nana Patole) आणि काँग्रेस (Congress) यांच्यात मोठ्या प्रमाणावर धुसफुस दिसुन येत आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी वंचित बहुजन आघाडीवर (Vanchit Bahujan Alliance) गंभीर आरोप केले होते. यालाच प्रत्त्युत्तर म्हणुन वंचितने मोठा गौप्यस्फोट केला आहे. वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले पण वंचितकडून त्यात अडथळे आणले गेले. नाना पटोले (Nana Patole) माईंड गेम करतो असा आरोप केला, टॉर्चर केले, अपमान केला गेला, असे असतानाही शेवटपर्यंत वंचितला (Vanchit Bahujan Alliance) मविआबरोबर घेण्याचा प्रयत्न केला. असा गंभीर आरोप आरोप नाना पटोले (Nana Patole) यांनी केला होता.

(हेही वाचा – IPL 2024, Sixes Galore : आयपीएलच्या पहिल्या २ आठवड्यात ३०० षटकारांची आतषबाजी )

वंचितने (Vanchit Bahujan Alliance) वेगळी भूमिका घेतली. पण, वैयक्तिक अपमानापेक्षा देशाचे संविधान व लोकशाही महत्वाचे आहे, असे पटोलेंनी अकोल्यात म्हटले होते. बाळासाहेब मी तुमच्या अकोल्यात येऊन सांगतो अजूनही रस्ते बंद झालेले नाहीत. तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे, एक जागा की दोन जागा पाहिजेत. नाना पटोले आपल्या जबाबदारीवर देईल. पण, महाराष्ट्रामध्ये मत विभाजन होऊन देशाला बर्बाद करणारी भाजप निवडून नाही आली पाहिजे, अनुयायी म्हणून मी या ठिकाणी स्विकारतो आहे. अर्ज मागे घेण्यापर्यंत वेळ आहे, आमचा प्रस्ताव मान्य असेल तर नाना पटोले निर्णय घेईल, अशीही ऑफर नाना पटोलेंनी (Nana Patole) दिली होती.

(हेही वाचा – Jammu Kashmir Infiltration: उरीमध्ये घुसखोरीचा डाव सुरक्षा जवानांनी उधळला, एक दहशतवादी ठार)

यावर वंचितने (Vanchit Bahujan Alliance) प्रत्यूत्तर दिले आहे. नाना पटोले (Nana Patole) तुम्हाला संविधान वाचवायचेच होते तर आमचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. पुंडकर यांना मविआच्या बैठकीत दीड तास बाहेर का बसवून ठेवले, ते सांगावे, असे आव्हान वंचितने दिले आहे. काँग्रेस (Congress) आणि आमच्या संबंधांत फूट पाडण्याचे काम करताना जेव्हा तुम्हाला काँग्रेसच्या (Congress) वरिष्ठ नेत्यांनी पकडले, त्या दिवसापासून काँग्रेसकडून मविआच्या बैठकांना बाळासाहेब थोरात का येऊ लागले? तुम्ही हे देखील अकोला वासियांना सांगावे, असा गौप्यस्फोट वंचितने करत आव्हान दिले आहे. तसेच काल अकोल्यात पटोलेंनी जॉनी वॉकरची जबरदस्त अॅक्टिंग केल्याचीही खिल्ली वंचितने (Vanchit Bahujan Alliance) उडविली आहे. (Nana Patole)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.