Namaz Break In Rajya Sabha : नमाजसाठी मिळणारा राज्यसभेतील अर्धा तासाचा ब्रेक रद्द

दाेन्ही सभागृहात एकरूपता आणण्यासाठी राज्यसभेत आधीच हा नियम तयार करण्यात आला आहे

394
Namaz Break In Rajya Sabha : नमाजसाठी मिळणारा राज्यसभेतील अर्धा तासाचा ब्रेक रद्द
Namaz Break In Rajya Sabha : नमाजसाठी मिळणारा राज्यसभेतील अर्धा तासाचा ब्रेक रद्द

सध्या संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अनेक महत्वाच्या विषयावरील विधेयक मांडली जात आहेत. संसदेच्या कामकाजासाठी प्रत्येक मिनिट महत्वाचा असल्यामुळे राज्यसभेतील प्रत्येक शुक्रवारी नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक रद्द करण्यात आला आहे.(Namaz Break In Rajya Sabha)

संसद अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी (जुम्मा) नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत यापुढे हाेणार नाही लाेकसभा व राज्यसभा संसदेचे दाेन अंग आहेत. राज्यसभेप्रमाणेच लाेकसभेतही सर्व वर्ग व समुदायाचे लाेक आहेत. त्यानंतर लाेकसभेचे सत्र सामान्य दिवसाप्रमाणे शुक्रवारीदेखील दुपारी २ वाजता सुरू हाेते. दाेन्ही सभागृहात एकरूपता आणण्यासाठी राज्यसभेत आधीच हा नियम तयार करण्यात आला. हे काही प्रथमच घडलेले नाही.

(हेही वाचा-PM Narendra Modi : ३७० कलम रद्द करणे हा केवळ निर्णय नसून आशेचा किरण आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी)

संसद अधिवेशनादरम्यान दर शुक्रवारी (जुम्मा) नमाजसाठी मिळणारा अर्धा तासाचा ब्रेक राज्यसभेत (Namaz Break In Rajya Sabha) यापुढे हाेणार नाही. द्रमुकचे खासदार तिरुची शिवा यांनी वरिष्ठ सभागृहात हा मुद्दा मांडला हाेता. त्यावर सभापती व उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले, यासंबंधीच्या नियमांतील बदल एक वर्षापूर्वीच करण्यात आला आहे.

राज्यसभेच्या ८ डिसेंबरच्या व्हिडिओनुसार दुपारच्या भाेजनानंतर दुपारी २ वाजता बैठक सुरू झाली तेव्हा शिवा यांनी हा मुद्दा मांडला. ते म्हणाले, दर शुक्रवारी सभागृहातील बैठक दुपारी २.३० वाजता सुरू हाेत हाेती. म्हणजे नमाजच्या ब्रेकनंतर ही बैठक व्हायची. या वेळी मात्र बैठक दाेन वाजता सुरू करण्यात आली आहे. त्यावर सभापती धनखड म्हणाले, एक वर्षापूर्वीच यासंबंधीच्या नियमांत बदल करण्यात आलेला आहे.

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.