Nagpur Flood : नागपूर पुरावरुन टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर बावनकुळेंचा हल्लाबोल; म्हणाले …

117
Nagpur Flood : नागपूर पुरावरुन टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंवर बावनकुळेंचा हल्लाबोल; म्हणाले ...

नागपुरात सध्या (Nagpur Flood) पावसाचं रौद्र रूप पाहायला मिळत आहे. शुक्रवार २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस पडला. या पावसामुळे नागपुरातील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अशातच अंबाझरी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तलावाचं पाणी शहरात शिरलं, त्यामुळे शहरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्वत्र पाणीच पाणी झाल्यामुळे परिसरातील लोकांच्या घरात पाणी शिरले आहे.

एनडीआरएफ व बचाव पथकाच्या जवानांकडून (Nagpur Flood) सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरु असून आतापर्यंत ४०० लोकांना वाचवण्यात यश आले आहे. मात्र दोन महिलांसह तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व परिस्थितीवर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. त्यांच्या टीकेला आता भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उत्तर दिलं आहे. “ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही त्यांनी नागपूरवर बोलू नये, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.

(हेही वाचा – Asian Games 2023 : जाणून घ्या भारतीय खेळाडूंचे सामने किती वाजता आणि कुठे बघायचे?)

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?

नागपुरात पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावासामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं होतं. शिवाय नागरिकांचं कोट्यवधींचं नुकसान झालं. यानंतर आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत नागपूर इथल्या पूर परिस्थितीवरुन भाजपवर टीका केली होती. “नागपुरात विकासाच्या नावाखाली जी सिमेंटची जंगलं वाढली आहे त्यामुळे अशी परिस्थिती ओढावली असून, याला काही नेते जबाबदार आहेत,” अशा आशयाचे ट्वीट आदित्य ठाकरे यांनी केलं होतं. त्यांच्या या टीकेला आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे.

‘त्यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही’

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की; “110 मिलिमीटर पाऊस दोन तासात पडतो, त्यावेळी जगातल्या कुठल्याही शहरात ही परिस्थिती निर्माण होते. नागपुरात तर फार चांगली व्यवस्था आहे. नागपूर शहर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे बदललं आहे. मात्र, ज्यांचं या शहरासाठी शून्य योगदान आहे, त्यात उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या लोकांचा सामावेश आहे. तर आदित्य ठाकरे यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी एक रुपयाही नागपूर शहरावर खर्च केला नाही. ज्यांनी नागपूरच्या विकासासाठी एक रुपया खर्च केला नाही त्यांना नागपूरवर बोलण्याचा अधिकार नाही. आम्ही नागपूर बघायला समर्थ आहोत. ज्यांना मुंबई सांभाळता आली नाही त्यांनी नागपूरवर बोलू नये,” असं बावनकुळे यांनी स्पष्ट म्हटलं आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.