Mumbai Rain: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये; राज्यातील पावसाचा आढावा घेणार

101
Mumbai Rain: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये; राज्यातील पावसाचा आढावा घेणार
Mumbai Rain: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये; राज्यातील पावसाचा आढावा घेणार

रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईची तुंबई (Mumbai Rain) झाली आहे. अशात यंत्रणा अलर्टमोडवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंत्रालयाच्या कंट्रोल रूममध्ये पोहोचले आहेत. इथे जात त्यांनी मुंबईसह राज्यातील पावसाचा आढावा घेतला आहे. यावेळी मंत्री दीपक केसरकर आणि मंगलप्रभात लोढा हे देखील उपस्थित आहेत. राज्यात ठिकठिकाणी दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं आहे. याचा मुख्यमंत्री आढावा घेत आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षात

मुसळधार पावसामुळे राज्यात आणि मुंबईत निर्माण झालेल्या पूर परिस्थिती आणि एकंदर अतिवृष्टीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातून आढावा घेत आहेत. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, मुंबई शहर जिल्हयाचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ‌ आय. एस. चहल, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आपत्ती विभागाच्या सचिव सोनिया सेठी आदी उपस्थित आहेत. (Mumbai Rain)

खड्ड्यात पडून दीड वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

पालघरमधून (Palghar) धक्कादायक बातमी समोर आली आहे. पावसाचे पाणी साचून तुडूंब भरलेल्या खड्ड्यात पडून दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. बोईसर-नवापूर रोडवर ही घटना घडली, यानंतर संतप्त स्थानिकांकडून बोईसरमध्ये रास्ता रोको करण्यात आला. माहीर मोशीन शिवानी या दीड वर्षीय चिमुकल्याचा खड्ड्यात पडून मृत्यू झाला. आई-वडिलांसोबत बाजारपेठेत जात असताना खड्ड्यात बाईक आदळल्याने हा अपघात घडला. या अपघातानंतर जमावाकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. (Mumbai Rain)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.