Mumbai Attack : मुंबईवर २६ नोहेंबर २००८ साली दहशतवादी हल्ला (terrorist attack) झाला होता. या हल्यात पोलीस शिपाई अंबादास पवार (Martyr Ambadas Pawar) हे हुतात्मा झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते २२ एप्रिलला पत्नी कल्पना पवार यांना प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक (Kalpana Pawar probationary DySP) पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले. या निर्णयानंतर कल्पना पवार यांनी समाधान व्यक्त करत, आपली ही देशसेवा करण्याची इच्छा असल्याचे बोलून दाखवले. (Mumbai Attack)
शहीद पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस… pic.twitter.com/MHM4k8sKAr
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 22, 2025
शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता…; CMO
हुतात्मा अंबादास पवार यांच्या पत्नी श्रीमती कल्पना पवार यांना नियुक्तीपत्र देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना हुतात्मा पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी असलेली शासनाची कृतज्ञता आणि संवेदनशीलता पुन्हा एकदा प्रत्यक्ष कृतीतून दाखवल्याचे CMOने पोस्टमध्ये म्हटले आहे.
(हेही वाचा – Love Jihad : अशोक नाव सांगत मुसलमान तरुणाने हिंदू अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात )
हे सरकार लाडक्या बहिणींचे; नियुक्तीनंतर कल्पना पवार यांच्या भावना
मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना कल्पना पवार म्हणाल्या, “माझ्या पतीप्रमाणेच मलाही आता देशसेवेची संधी मिळाली आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, लाडक्या बहिणींचे आणि देशाच्या रक्षणासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्मा वीरांचे आहे. हे माझ्या या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.” असे विधान कल्पना पवार यांनी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community