Mumbai Airport : विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर; कारण… 

कुर्ला अंधेरी मार्गावरील जरीमरी कब्रस्तान समोर भिंत कोसळली असून रनवे लागूनच आहे.

182
विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर; कारण... 
विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर; कारण... 

जरीमरी येथील मुंबई विमानतळ Mumbai Airport रनवे जवळील भिंत कोसळली असून अद्यापही कोणत्याही प्रकारचे काम सुरु झाले नाही. फक्त पत्र्याने परिसर बंदिस्त केला आहे. ही घटना रविवारी, ७ मे रोजी संध्याकाळी ६.४० वाजता घडली. विमानतळाची सुरक्षा ऐरणीवर असून प्रशासन धिम्म गतीने काम करत आहे.

AIRPORT 1

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ट्विट करत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तत्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. कुर्ला अंधेरी मार्गावरील जरीमरी कब्रस्तान समोर भिंत कोसळली असून रनवे लागूनच आहे. याठिकाणी पालिकेचे काम सुरु असून जेसीबीमुळे भिंत कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विमानतळ Mumbai Airport प्रशासनाने ज्या तीव्रतेने कारवाई करणे गरजेचे आहे, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनिल गलगली यांच्या मते अशा वेळी भिंत जलद गतीने बांधणे आवश्यक असताना फक्त पत्र्याने काय होईल, हा मोठा प्रश्न आहे.

(हेही वाचा Karnataka Elections 2023: काँग्रेसचा बदला पंतप्रधान मोदी नाहीतर कर्नाटकातील जनता घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.