Karnataka Elections 2023: काँग्रेसचा बदला पंतप्रधान मोदी नाहीतर कर्नाटकातील जनता घेणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

134
काँग्रेसचा बदला पंतप्रधान मोदी नाहीतर कर्नाटकातील जनता घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काँग्रेसचा बदला पंतप्रधान मोदी नाहीतर कर्नाटकातील जनता घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराची सोमवारी, ८ मेला सांगता होणार आहे. यापूर्वी झालेल्या प्रचारात भाजप आणि काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावेळी काँग्रसेने पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी अपशब्दाचा वापर करू टीका केली. याच पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसवर निशाणा साधला आणि पंतप्रधान मोदींसंबंधित काँग्रेसने केलेल्या अपशब्दाचा बदला कर्नाटकातील जनता घेणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

(हेही वाचा – …यासाठी मुद्दाम कर्नाटक दौऱ्यावर आलो; मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार)

नक्की काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

एका खासगी मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘मर्यादा आणि पातळी सोडून काँग्रेसचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतायत. जेव्हा जेव्हा काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आरोप केले, त्यांच्यासंबंधित अपशब्द वापरले तेव्हा तेव्हा काँग्रेसला त्याचं प्रायश्चित मिळालं. मोदींजी काही बोलले नाही, त्यांनी बदला घेतला नाही. पण मतदारांनी मतदानाद्वारे त्यांचा बदला घेतला. ज्या ४०० जागा एकेकाळी काँग्रेसल्या आल्या होत्या, त्या ४०वर आल्या. गुजरातच्या निवडणुकीत देखील त्यांना मौत का सौदागर, चौकीदार चोर आणि आताच्या निवडणुकीत साप, नालायक वगैरे अशा प्रकारचे अपशब्द वापरलेत. या कर्नाटकमधील जनता येणाऱ्या १० तारखेला मतदानाद्वारे याचा बदला घेईल. या कर्नाटकमध्ये भारतीय जनता पक्षाला प्रचंड बहुमत याठिकाणी मिळेल.’

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.