Jagdeep Dhankhar यांच्या सन्मानात रालोआचे खासदार तासभर उभे राहिले

तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची केलेल्या मिमिक्रीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामुळे राज्यसभेचे सभापती धनखड फार दुखावले आहेत.

191
Jagdeep Dhankhar यांच्या सन्मानात रालोआचे खासदार तासभर उभे राहिले
Jagdeep Dhankhar यांच्या सन्मानात रालोआचे खासदार तासभर उभे राहिले

भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या खासदारांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांच्या अपमानाचा विरोध आगळ्यावेगळ्या पध्दतीने केला. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी सुध्दा विरोधी पक्षांनी केलेल्या अपमानावर नाराजी व्यक्त केली होती. (Jagdeep Dhankhar)

तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांची केलेल्या मिमिक्रीचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामुळे राज्यसभेचे सभापती धनखड (Jagdeep Dhankhar) फार दुखावले आहेत. मात्र, विरोधकांनी देशाचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती यांचा अपमान केला आहे. भाजप (BJP) ही बाब अजिबात स्वीकार करणार नाही. विरोधकांच्या कृत्याचा विरोध रालोआच्या खासदारांनी राज्यसभेत तासभर उभे राहून केला. (Jagdeep Dhankhar)

(हेही वाचा – Naxalite attack: नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ, भामरागड तालुक्यात भीतीचे वातावरण)

सदर घटना लज्जास्पद, हास्यास्पद, अस्वीकार्य

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) यांनी तृणमूलचे खासदारावर नक्कल करण्याची टीका केली. जगदीप धनखड (Jagdeep Dhankhar) म्हणाले की, हे लज्जास्पद, हास्यास्पद आणि अस्वीकार्य आहे. एक खासदार खिल्ली उडवत आहे आणि दुसरा खासदार या घटनेची व्हिडिओग्राफी करत आहे हे लज्जास्पद, हास्यास्पद, अस्वीकार्य आहे. कल्याण बॅनर्जी निलंबित १४१ विरोधी खासदारांपैकी एक आहेत. त्यांना गेल्या आठवड्यात निलंबित करण्यात आले होते. काल मंगळवारी नवीन संसद भवनाच्या मकर गेटजवळ सेरामपूरचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपतींची नक्कल करण्यास सुरुवात केली. यावेळी इतर खासदार हसताना दिसले. काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) या कृत्याचा व्हिडिओ बनवताना दिसत होते. (Jagdeep Dhankhar)

भाजप (BJP) नेते संबित पात्रा यांनी या कृत्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. ‘देश लक्षात ठेवेल… जेव्हा देशाचे उपराष्ट्रपती आणि संवैधानिक संस्थेची खिल्ली उडवली जात होती. तेव्हा शहजादा उभा राहून व्हिडिओ बनवत होता. भारत तोडणाऱ्यांना पाठीशी घालून भारताला जोडण्याचे नाटक करणाऱ्यांचा मुख्य अजेंडा संघटित करण्याचा नसून तोडण्याचा आहे. देशातील जनता २०२४ मध्ये अहंकारी लोकांचा अहंकार नक्कीच संपवतील’, असे ट्वीट त्यांनी केले आहे. (Jagdeep Dhankhar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.