Naxalite attack: नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ, भामरागड तालुक्यात भीतीचे वातावरण

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नक्षलवादी तेथे गेले.

154
Naxalite attack: नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ, भामरागड तालुक्यात भीतीचे वातावरण
Naxalite attack: नक्षलवाद्यांकडून जेसीबीसह ३ ट्रॅक्टरची जाळपोळ, भामरागड तालुक्यात भीतीचे वातावरण

सशस्त्र नक्षलवाद्यांनी (Naxalite attack) मंगळवारी, १९ डिसेंबरला रात्री भामरागड तालुक्यातील हिदूर-पोयरकोटी रस्त्याच्या कामासाठी वापरलेला १ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टरची जाळपोळ केल्‍याचे समोर आले आहे. या घटनेमुळे तालुक्यात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे.

मागील काही दिवसांपासून हिदूर-पोयरकोटी रस्त्याचे काम सुरू असून, मंगळवारी संध्याकाळी काम आटोपल्यानंतर वाहनचालकांनी ट्रॅक्टर आणि जेसीबी हिदूर गावानजीक रस्त्याच्या कडेला उभे केले होते. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नक्षलवादी तेथे गेले. त्यांनी डिझेल ओतून जेसीबी आणि ३न ट्रॅक्टरला आग लावली. बुधवारी, २० डिसेंबरला सकाळी जाळपोळीची घटना नागरिकांच्या लक्षात आली. 

(हेही वाचा – Former US President Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकणार नाहीत, कारण…जाणून घ्या )

२२ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन

बिहार, झारखंड आणि उत्तर प्रदेशातील प्रतिक्रांतीवादी हल्ल्यांच्या विरोधात २२ डिसेंबरला भारत बंदचे आवाहन केले आहे. पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.