क्रूझवरील कारवाई राष्ट्रवादीचाच ‘प्लॅन’, सूत्रधार सुनील पाटील!

94

क्रुझवरील ड्रग्स पार्टीवर करण्यात आलेली कारवाई हे राष्ट्रवादी काँग्रेसचेच षडयंत्र होते, त्यामागील प्रमुख सूत्रधार हा सुनील पाटील होता. पाटील हा २० वर्षांपासूनचा एनसीपीमध्ये आहे आणि एनसीपीच्या मंत्र्यांचा निकटवर्ती आहे. किरण गोसावी, सॅम डिसुझा, प्रभाकर साईल हे सर्व जण पाटीलचीच माणसे आहेत, महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी, एनसीबीच्या अधिकाऱ्याला बदनाम करण्यासाठी, भाजपाला बदनाम करण्यासाठी, ड्रग्सच्या धंद्याला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीने हा प्लॅन तयार केला, असा गंभीर आरोप भाजपचे नेते मोहित भारती यांनी पत्रकार परिषदेत केला.

कोण आहे सुनील पाटील? 

मोहित भारती यांच्या म्हणण्यानुसार सुनील पाटील हा २० वर्षांपासून एनसीपीच्या संपर्कात आहे. तो एनसीपीच्या मंत्र्यांच्या जवळचा आहे. २०१४ पर्यंत तो बदल्यांचे रॅकेट चालवायचा. त्यानंतर सरकार बदलले, तेव्हा सुनील पाटील गायब झाला, २०१९मध्ये सरकार बदलले आणि पाटील पुन्हा सक्रिय झाला.

(हेही वाचा : कोरोनाचे ‘कम बॅक’! ‘या’ देशांमध्ये वाढतोय संसर्ग)

क्रूझवरील पार्टीची माहिती सुनील पाटीलला होती 

क्रूझवर पार्टीसाठी येणाऱ्या २७ लोकांच्या नावांची यादी पाटीलकडे होती. त्याने १ सप्टेंबर रोजी सॅम डिसुझाला फोन करून ही माहिती दिली आणि अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकाऱ्याशी संपर्क करवून देण्याची मागणी केली. त्यानंतर पाटीलचा अधिकारी व्ही.व्ही. सिंग यांच्याशी संपर्क झाला. २ सप्टेंबरला पाटीलला सॅम डिसुझाला म्हणाला, मला एनसीबीचा माणसाशी भेट करून दे.  डिसुझाने किरण गोसावीशी संपर्क करून दिला. अशा प्रकारे सुनील पाटीलला त्या ड्रग्सच्या पार्टीची इत्यंभूत माहिती आधीच कशी होती?, असा प्रश्न भारती यांनी केला. क्रूझवरील कारवाईशी भाजपचा संबंध आहे, असे चित्र निर्माण करण्यात आले. राष्ट्रीय यंत्रणेला बदनाम करण्यासाठी मंत्री कार्यरत झाले, त्यांना राज्यातील ड्रग्सच्या धंद्याला बळकटी द्यायची आहे का, असा प्रश्न भारती यांनी केला.

एनसीपीचा दाऊदशी संबंध!

दाऊदच्या म्याव म्याव या अमली पदार्थांचा धंदा करणाऱ्या चिंकू पठाणसोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक होऊन डील झाली होती. त्यावेळी तिथे नवाब मलिक यांचा जावई होता. त्याचे फोटो समोर आले आहेत. यावरून एनसीपीचा कुख्यात गुंड दाऊदसोबत काय संबंध आहेत? अमली पदार्थांच्या धंद्यातील पैसा दहशतवादी कारवायांसाठी वापरण्याचा कट एनसीपीचा होता का?, असा प्रश्न भरती यांनी विचारला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.