Modi Ka Pariwarला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंतप्रधान म्हणाले…

134
Modi Ka Pariwarला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंतप्रधान म्हणाले...
Modi Ka Pariwarला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, पंतप्रधान म्हणाले...

लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल त्यांनी जनतेचे आभार मानले तसेच निवडणुकीच्या प्रचारादरम्यान वापरलेली ‘मोदी का परिवार’ ही घोषणादेखील आता ट्विटरच्या प्रोफाईलवरून हटवण्याची विनंती केली आहे.

आपल्या ट्विटर अकाऊंटवरून मोदींनी आपल्या समर्थकांना हे आवाहन केलं आहे. मोदींनी म्हटलं की, निवडणूक प्रचारावेळी देशभरातील लोकांनी आपल्या ट्विटरवर ‘मोदी का परिवार’ अशी घोषणा लावत माझ्याप्रती आपुलकी व्यक्त केली होती. यातून मला खूपच बळ मिळालं. त्यामुळे भारताच्या लोकांनी NDAला सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवून दिलं. हा एक प्रकारचा विक्रमच आहे तसेच आम्हाला पुन्हा आपल्या देशासाठी काम करण्याची संधी दिली.

(हेही वाचा – MLA Raja Singh Thakur यांना धमकी देणा-या मोहम्मद वसीमला घातल्या बेड्या  )

…पुन्हा एकदा भारताच्या जनतेचे आभार
आपण सर्वजण एका कुटुंबाचा भाग आहोत, हा संदेश या मोहिमेतून प्रभावीपणे सांगितला गेला. त्यामुळे मी पुन्हा एकदा भारताच्या जनतेचे आभार मानतो आणि विनंती करतो की, आता तुम्ही मोदी का परिवार तुमच्या सोशल मीडिया हँडलवरून काढून टाका. यामुळे तुमचे प्रोफाईलवरील नाव बदलेल पण आपले संबंध भारताला मजबुतीने पुढे घेऊन जातील.

प्रत्युत्तर म्हणून मोदींची घोषणा…
यावर्षी मार्च महिन्यात तेलंगाणातील अदिलाबाद इथल्या एका सार्वजिनिक सभेत पंतप्रधानांनी संपूर्ण देशच ‘मोदी का परिवार’ आहे, ही घोषणा दिली होती. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी एका सभेत बोलताना मोदींवर टीका केली होती. त्यात ‘पंतप्रधान मोदींना स्वतःचं कुटुंब नाही’ असा उल्लेख केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी ही घोषणा दिली होती.

मोदी का परिवार
मोदींनी ही घोषणा दिल्यानंतर लगेचच भाजपाच्या नेत्यांनी आपल्या ट्विटर प्रोफाईलच्या नावापुढं ‘मोदी का परिवार’ असं लिहिलं होतं. यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीदेखील आपल्या ट्विटरवर ‘मोदी का परिवार’ असं लिहिलं होतं.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.