MLA Raja Singh Thakur यांना धमकी देणा-या मोहम्मद वसीमला घातल्या बेड्या 

मोहम्मद वसीम हा मूळचा जुन्या शहरातील बारकास येथील असून त्याचा फोन आणि आयपी ॲड्रेसवरून शोध घेण्यात आला.

118

भारतीय जनता पार्टीचे आमदार टी राजा सिंह (MLA Raja Singh Thakur) यांना फोनवरून धमकी दिल्याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी मोहम्मद वसीम या अनिवासी भारतीयाला अटक केली आहे. दुबई, यूएई येथील रहिवासी असलेल्या वसीमने गोशामहलच्या आमदाराला वारंवार फोन केले, यामुळे आमदार टी राजा सिंह यांनी हैदराबादमधील सायबर क्राइम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

(हेही वाचा Hindu Temple : श्रद्धाजिहादविरुद्ध त्र्यंबकेश्वरमध्ये हिंदूंची एकजूट; प्रसाद शुद्धीसाठी ओम प्रतिष्ठानची स्थापना)

यापूर्वी अनेकदा धमकीचे फोन आलेले 

मोहम्मद वसीम हा मूळचा जुन्या शहरातील बारकास येथील असून त्याचा फोन आणि आयपी ॲड्रेसवरून शोध घेण्यात आला. तपासानंतर पोलिसांनी लुकआउट नोटीस  जारी केली आणि सर्व विमानतळांना सतर्क केले. हैदराबादमधील शमशाबाद विमानतळावर येताच सायबर क्राईम पोलिसांनी वसीमला पकडले. ही घटना पहिलीच नाही, कारण राजा सिंह (MLA Raja Singh Thakur) यांना यापूर्वीही अनेकदा परदेशातून धमकीचे फोन आलेले आहेत. याआधीच्या एका प्रकरणात हैद्राबाद येथील एका व्यक्तीला अशाच धमक्यांच्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या धमक्यांचे फोन वारंवार आल्यामुळे राजा सिंह यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सनातन धर्माशी संबंधित कामामुळे आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा दावा टी राजा सिंह (MLA Raja Singh Thakur) यांनी केला आहे. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि तेलंगणाचे पोलीस महासंचालक (डीजीपी) यांना लेखी तक्रारी पाठवल्या असून, धमकीच्या संदेशांचे स्क्रीनशॉट पुरावे म्हणून पाठवले आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.