मनसेची पाणी संघर्ष यात्रा! २५ वर्षांच्या पाणी समस्येवर २५ हजार पत्र

79

भाजपनंतर आता मनसेने औरंगाबादमधील पाणीप्रश्न उचलून धरला आहे. मनसेकडून शनिवार १४ मे पासून औरंगाबादमधील पाणी प्रश्नावर मोठे आंदोलन केले जाणार आहे. मनसेतर्फे शहरातील प्रत्येक भागात फिरून नागरिकांकडून पाणी समस्येविषयी पत्र लिहून घेतले जाणार आहे. मागील २५ वर्षापासून न सुटलेल्या पाणी प्रश्नावर मनसे नागरिकांकडून २५ हजार पत्र लिहून घेणार आहे.

( हेही वाचा : दरेकरांना अटक अन् तात्काळ सुटका; ९०४ पानांचे दोषारोप पत्र दाखल )

जायकवाडी ते नक्षलवाडी जलवाहिनीचे काम २५ वर्षांत पूर्ण झाले नसल्याने औरंगाबाद शहरातील नागरिक पाणी टंचाईने त्रस्त आहेत. शहरातील काही भागात ८ ते ९ दिवस आड पाणी येतेय हा संताप नागरिक २५ हजार पत्रांमार्फत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार अशी माहिती सुमीत खांबेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. १४ मे पासून वॉर्डांमध्ये पाणी संघर्ष यात्रा काढली जाणार आहे. मनसेचे कार्यकर्ते घरोघरी जात पत्र लिहिण्याचे आवाहन करणार आहेत.

२५ वर्षाच्या पाणी समस्येवर मनसेचे ९ प्रश्न

  1. पाणी पट्टीमध्ये केलेली वाढ तात्काळ ५० टक्क्यांनी कमी करावी. लोकांनी ४ हजार ५०० रुपये पाणीपट्टी का भरावी?
  2. सिडको-हडको येथे पाण्याचे त्वरीत नियोजन का केले जात नाही?
  3. टॅंकर भरले जातात त्याठिकाणी बारकोड यंत्रणा का नाही?
  4. मनपाच्या ८५ टॅंकरपैकी केवळ ४० टॅंकरवर जीपीएस लावण्यात आले आहेत, उर्वरित टॅंकरवर जीपीएस नाही म्हणजे सत्ताधारी व मनपा पाणी चोरीसाठी सोबत काम करीत आहेत का?
  5. शहरातील २५० लाइनमनच्या समस्यांची दखल का घेतली नाही ?
  6. जायकवाडी ते नक्षलवाडी जलवाहिनीचे काम २५ वर्षांत का पूर्ण झाले नाही ?
  7. नवीन पाईप तयार होण्याची गती पाहता नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी किमान दोन-तीन वर्षे लागतील लोकांनी एवढे दिवस का थांबावे?
  8. प्रधान सचिवांना निवडणूक आली म्हणून पाहणीसाठी पाठवले ते एवढे दिवस कुठे होते?
  9. किमान १६MLD पाणी दररोज वाया जाते याला जबाबदार कोण?

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.