“ज्यांचा आदर्शच दाऊद आहे, त्यांना छत्रपतींबद्दल बोलण्याचा अधिकार नाही”

110

नुकतीच राज्यभरात मनसेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तिथीनुसार जल्लोषात साजरी करण्यात आली. दरम्यान, महाराजांची जयंती हा दिवस मराठी माणसांसाठी सण असून तिथीनुसारच महाराजांची जयंती साजरी करायला हवी, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यानुसार, तमाम मनसैनिकांनी शिवतीर्थावर आश्वारूढ शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून साजरी केली. याबाबत राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती, यावरूनच मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट करून मिटकरींना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले संदीप देशपांडे

”जो पक्ष दाऊद च्या माणसांना विमानातून फिरवतो, ज्यांचा मंत्री दाऊद ला पैसे पुरवतो, ज्यांचा आदर्शच दाऊद आहे त्या मटण करीं ना छत्रपतीं बद्दल बोलण्याचा अधिकारच नाही.”, असे संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन म्हटले आहे.

(हेही वाचा- शिवतीर्थावर महाराजांच्या साक्षीने राज ठाकरेंनी दिली मनसैनिकांना ‘ही’ शपथ)

मनसेच्या खोपकरांचा तीव्र संताप 

अमोल मिटकरींनी शिवजयंती निमित्त केलेलं विधान त्यांच्या अंगाशी आले आहे. या विधानानंतर मनसेने तीव्र संताप व्यक्त केला आहे. मिटकरींनी केलेल्या वक्तव्यावर मनसेच्या अमेय खोपकरांनी सुनावलं. शिवजयंती ही आमच्यासाठी सण-उत्सव आहे. दिवाळी, गणपती यांसारखी हिंदू सणांप्रमाणे शिवजयंती आमच्यासाठी सण आहे, असे उत्तर अमेय खोपकर यांनी दिले होते. त्यानंतर, आता मनसेच्या संदीप देशपांडे यांनी मिटकरींना मटण करी असा टोला लगावत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मिटकरी?

महाराष्ट्र शासनाने २००० साली १९ फेब्रुवारी ही शिवजयंतीसाठी अधिकृत तारीख जाहीर केली. पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या तिथीचा वाद उकरून मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे राजकारण बंद झाले पाहिजे. राज्यातील जनतेची देखील हीच इच्छा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे तिथी आणि तारखेच्या बाहेर पडून व्यापक दृष्टीकोनातून पाहावे, असे अमोल मिटकरी म्हणाले.

मतांसाठी महाराजांची जयंती साजरी

यासह ते असेही म्हणाले होते की, महाराजांची जयंती रोज साजरी झाली तरी हरकत नाही. परंतु आज जी जयंती साजरी करतोय ती मतांसाठी केली जात आहे. मला माझं मत मागण्याचा अधिकार आहे. शिवजयंती साजरी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तुमचा वाढदिवस तिथीनुसार साजरा करता का? मनसेचा वर्धापन दिन तिथीनुसार साजरा करता का? छत्रपती शिवाजी महाराज केवळ हिंदुचे होते का? ते सर्वांचे होते. १९ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले यांनी साजरी केली. १९ फेब्रुवारीच शिवजयंती असावी हे शासनमान्य झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.