‘ठाकरी’ बाणा म्हणत, प्रबोधनकारांच्या पुण्यतिथीदिनी राज ठाकरेंची खास पोस्ट!

95

संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील खंदे शिलेदार, समाजसुधारक, पत्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी आज, रविवारी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने त्यांचे नातू मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांना आभिवादन करणारी एक पोस्ट शेअर केली आहे. यासोबत त्यांनी एक जुना फोटो पोस्ट केला आहे. प्रबोधनकार ठाकरेंचे स्वभावगुण आणि वैशिष्ट्य सांगत त्यांनी दिलेला ठाकरी बाणा, जो माझ्यासह पुढच्या पिढीत आला आहे, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

काय आहे राज ठाकरेंची खास पोस्ट

फेसबुक पोस्टमध्ये राज ठाकरेंनी असे लिहिले की, आज आमच्या आजोबांची – प्रबोधनकारांची पुण्यतिथी. अन्याय दिसला तर लाथ मारायची, जे खरं असेल ते ठासून मांडायचं, आणि हे करताना नफा, नुकसान असल्या क्षुल्लक गोष्टींचा विचार करायचा नाही, हा आजोबांनी दिलेला ‘ठाकरी’ बाणा, जो पुढच्या पिढीत आला आणि माझ्यातपण आला. मी आजोबांनी रुजवलेला हा ठाकरी बाणा कायम कटाक्षाने अंमलात आणायचा प्रयत्न करत आलोय आणि पुढे पण करत राहीन. आणि हेच बाळकडू पुढे पण देईन हे नक्की. आजोबांच्या स्मृतीस अभिवादन केले आहे.

raj thackrray 2

दरम्यान, प्रबोधनकार ठाकरे यांचे साहित्य आणि विचार वाचकांपर्यत पोहचविणाऱ्या अद्ययावत अशा ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर रविवारी एकत्र येणार आहेत. ‘प्रबोधनकार डॉट कॉम’ या संकेतस्थळाच्या लोकार्पणाचे प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.