Raj Thackeray : राज ठाकरे घेणार आढावा बैठक

111
Raj Thackeray : राज ठाकरे घेणार आढावा बैठक
Raj Thackeray : राज ठाकरे घेणार आढावा बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात  (Lok Sabha elections) पक्षाची २ ऑक्टोबर रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत २० लोकसभा मतदारसंघांची चर्चा होणार आहे. राज ठाकरे यांनी २० लोकसभा मतदारसंघांसाठी २० निरीक्षक नेमले होते. हे निरीक्षक आता २ तारखेला आपला अहवाल सादर करणार आहेत. सदर बैठकीत राज ठाकरे अहवाल पाहून पुढचा निर्णय घेणार आहेत. (Raj Thackeray)

यामध्ये मनसे नेते आणि राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे (Amit Thackeray)  यांच्यावर पुणे लोकसभा मतदारसंघाचा निरीक्षक म्हणून जबाबदारी होती. ते देखील या बैठकीत आपला अहवाल सादर करणार आहेत. नुकतीच अमित ठाकरे यांनी पुण्यामध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा केली होती. पुणे लोकसभा मतदारसंघातून मनसेचे कोणते नेते इच्छुक आहेत, याबाबत देखील अमित ठाकरे यांनी चाचपणी केली होती. हा सर्व अहवाल अमित ठाकरे २ तारखेच्या बैठकीत राज ठाकरे यांच्यासमोर ठेवणार आहेत. (Raj Thackeray)

(हेही वाचा – Indian Economy : जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू – राजीव चंद्रशेखर)

२० लोकसभा मतदारसंघातील (Lok Sabha constituency) निरीक्षकांकडून येणाऱ्या अहवालानंतर राज ठाकरे पुढील रणनीती ठरवणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत अहवाल पाहिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जाणार आहे, या संदर्भात चर्चा होऊन राज ठाकरे निर्णय घेणार आहेत. (Raj Thackeray)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.