Indian Economy : जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू – राजीव चंद्रशेखर

120
Indian Economy : जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने भारताची वाटचाल सुरू - राजीव चंद्रशेखर

भारतात 2014 पासून विविध क्षेत्रांत सातत्याने परिवर्तन होत आहेत. त्यामुळेच जपान आणि जर्मनीला मागे टाकत भारताची जगातील (Indian Economy) तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे, असे प्रतिपादन उद्योजकता आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केले आहे. बंगाल वाणिज्य आणि उद्योग महासंघाने आयोजित केलेल्या सहाव्या भारतीय आर्थिक परिषदेला त्यांनी संबोधित केले.

काय म्हणाले राजीव चंद्रशेखर ?

जगातील सर्वात मोठ्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये (Indian Economy) स्थान मिळवताना आपण खूप अंतर पार केले आहे. आपण येत्या तीन वर्षात जपान आणि जर्मनीला मागे टाकून अव्वल 5 मधून अव्वल 3 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवू अशी हमी आपल्या पंतप्रधानांनी दिली. आपल्या देशातील आर्थिक वृद्धी ही केवळ संख्याशास्त्रापुरती मर्यादित नाही. तर या वृद्धीमुळे केंद्र सरकारला अतिशय महत्वाच्या अशा आरोग्य, शिक्षण आणि रोजगार निर्मिती सारख्या क्षेत्रांमध्ये पायाभूत गुंतवणूक करणे शक्य झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने (Indian Economy) पायाभूत सुविधांच्या उभारणीसाठी आतापर्यंतचा सर्वाधिक निधी दिला आहे.”

(हेही वाचा – OBC Reservation : अखेर २१ दिवसांनंतर उपोषण मागे)

पुढे बोलतांना राजीव चंद्रशेखर यांनी सांगितलं की; भारतातील शासनाबद्दल जागतिक दृष्टिकोनात (Indian Economy) आमूलाग्र बदल होत आहेत. भारतात लोकशाही पद्धतीने सुरळीत कामकाज होऊ शकत नाही, असा जगाचा समज होता, विशेषतः चीनसारख्या हुकूमशाही राष्ट्रांचा. मात्र ही धारणा कित्येक वर्ष टिकून होती. 2015 मध्ये आपल्या पंतप्रधानांनी बदल घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून भारताबद्दलच्या या धारणेमध्ये परिवर्तन घडवून आणले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.