“मांजर लपून दूध पीत होती तर…चौकशी झालीच पाहिजे”; मनसेचे पेडणेकरांवर टीकास्त्र

106

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची SRA घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. यावरुन मनसे नेते गजानन काळे यांनी किशोरी पेडणेकरांवर अत्यंत खोचक टीका केली आहे. मोरुच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचा, अशा शब्दात किशोरी पेडणेकरांवर टीकास्त्र डागले आहे. एसआरए योजनेत स्वत: ला घर आणि गाळे मिळवण्यासाठी ही मांडर लपून दूध पित होती तर, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.

किशोरी पेडणेकर यांना दादर पोलीस स्टेशनमधून चौकशीकरता बोलावण्यात आले आहे. एसआरएमध्ये घर देण्याच्या नावाखाली काहींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिका अधिका-यांच्या संगनमताने ही फसवणूक झाली. यात चार जणांना अटकही करण्यात आली आहे. किशोरी पेडणेकर यांच्या जवळच्या व्यक्तीसह पालिका कर्मचा-यांचा समावेश असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मनसे नेते गजानन काळे यांचे ट्वीट

मोरुच्या मावशीने मोठाच डल्ला मारला म्हणायचा. गोरगरीब झोपडपट्टीवासीयांसाठी असलेल्या SRA योजनेत स्वत:ला घर व गाळे, मांजर लपून दूध पीत होती तर. या तर मुंबई पोखरणारी घूस निघाली, असे म्हणायचे का आता? या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणातील काॅमेडी क्वीन भारती सिंग … किशोरी भव असे ट्वीट गजानन काळे यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.