राज ठाकरेंच्या गर्जनेसह मनसेच्या वर्धापन दिनाचा टीजर रिलीज; पाहा व्हिडीओ

148

येत्या 9 मार्च रोजी मनसेचा वर्धापन दिन आहे. यादिवशी राज ठाकरे सध्याच्या सुरु असलेल्या राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे. यातच वर्धापन दिनाचा टीजर मनसेकडून लाॅन्च करण्यात आला आहे.

संदीप देशपांडेंचे ट्वीट

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी वर्धापन दिनाच्या टीजरचा व्हिडीओ आपल्या ट्वीटरवरुन शेअर केला आहे. त्यावर ‘प्रतीक्षा नऊ मार्च’ची असेही त्यांनी लिहिले आहे.

( हेही वाचा: संजय राऊतांना बसणार धक्का; गजानन कीर्तिकर संसदेच्या गटनेतेपदी येणार? )

टीजरमध्ये काय?

संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या टीजरमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आवाजातील काही वाक्य सुरुवातीला ऐकायला मिळत आहेत. त्यात राज ठाकरे लढवय्या आहेत. महाराष्ट्राच्या वाट्याला जाण्याचा प्रयत्न करु नका. शिवरायाचा तिसरा नेत्र उघडला तर सगळेच भस्मसात व्हाल, असे बोलताना दिसत आहेत. त्यासोबतच राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे हेही त्या टीजरमध्ये दिसत आहेत. त्यामुळे अमित ठाकरेंवरही आणखीन जबाबदा-या दिल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.