Assembly Election 2023 : राहूल गांधींना लोकांनी फेकून दिलेलं आहे – प्रवीण दरेकर

एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर काही जण उथळ झाले होते पण आम्हाला भाजप व जनता मोदींच्या बाजूने असल्याचा ठाम विश्वास होता. आजच्या निकालात तेच दिसत आहे.

139
Assembly Election 2023 : राहूल गांधींना लोकांनी फेकून दिलेलं आहे - प्रवीण दरेकर
Assembly Election 2023 : राहूल गांधींना लोकांनी फेकून दिलेलं आहे - प्रवीण दरेकर

चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजपचे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. यावर बोलताना भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, या विजयासाठी भाजपने प्रचंड मेहनत केली असल्याचे दरेकर यांनी सांगितले. कॉंग्रेसची लाट येणार अशा प्रकारचं चित्र रंगवलं जात होतं, त्याचं उत्तर निकालातून मिळालेलं आहे. राहूल गांधींना लोकांनी फेकून दिलेलं असल्याचेही दरेकर म्हणाले.  (Assembly Election 2023)

(हेही वाचा : Assembly Election 2023 : भाजपच्या दिल्ली मुख्यालयात उत्साहाचे वातावरण)

सध्या चार पैकी तीन राज्यानं मध्ये भाजप आघाडीवर आहे. यावेळी दरेकर यांनी चार राज्यातील मतमोजणी सुरु आहे. त्यावर बोलताना दरेकर म्हणाले की, एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर काही जण उथळ झाले होते पण आम्हाला भाजप व जनता मोदींच्या बाजूने असल्याचा ठाम विश्वास होता. आजच्या निकालात तेच दिसत आहे. काँग्रेस ही स्वतःसाठीच काम करते. हा पक्ष गटातटात विभागाला आहे. त्यामुळे त्याचा फटका त्यांना बसला अशी प्रतिक्रिया भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. (Assembly Election 2023)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.