MLA Disqualification Case : अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

ईडीची यंत्रणा महाराष्ट्राच्या हातात आहे काय? असा सवाल करत तुमची चूक नाही आणि कर नसेल तर डर कशाला हवा. आमचे सरकार सूडबुद्धीने आणि राजकीय आकस ठेवून काम करत नाही. कोरोनाच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी बॉडीबॅग, खिचडीत पैसे खाल्ले. त्यामुळे आम्ही त्यांना कफनचोर म्हणायचे का? असा प्रश्न शिंदे यांनी केला.

154
MLA Disqualification Case : अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
MLA Disqualification Case : अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागेल; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. लोकसभा आणि विधानसभेत पहिल्या दिवसापासून आमच्याकडे बहुमत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने आम्हाला शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले आहे. आमचे सरकार नियमानुसार आणि घटनेनुसार स्थापन झाल्याने आमदार अपात्रतेचा निकाल गुणवत्तेवर लागले, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी (०९ जानेवारी) व्यक्त केला. (MLA Disqualification Case)

गेल्या वर्षी जून २०२२ मध्ये शिवसेनेत अभूतपूर्व फूट पडल्याने उबाठा गटाने (UBT Group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासह १६ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आमदार अपात्रता प्रकरणी सुनावणी पूर्ण केली आहे. या सुनावणीचा निकाल मंगळवारी अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (०९ जानेवारी) प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आमदार अपात्रतेचा निकाल आपल्या बाजूने लागेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. आमच्याकडे असलेले बहुमत लक्षात घेता निकाल गुणवत्तेवर लागला पाहिजे, असेही शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – Shri Malanggad : मुख्यमंत्री श्रीमलंग गडाची मुक्तता करणारच; डॉ श्रीकांत शिंदेंची ग्वाही)

विरोधकांवर एकनाथ शिंदे यांची टीका

उबाठा गटाचे (UBT Group) आमदार आणि माजी राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी मंगळवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) छापा टाकला आहे. यावरून विरोधी पक्षाने केलेल्या आरोपांकडे लक्ष वेधले असता शिंदे (CM Eknath Shinde) यांनी या आरोपाचे खंडन केले. ईडीची (ED) यंत्रणा महाराष्ट्राच्या हातात आहे काय? असा सवाल करत तुमची चूक नाही आणि कर नसेल तर डर कशाला हवा. आमचे सरकार सूडबुद्धीने आणि राजकीय आकस ठेवून काम करत नाही. कोरोनाच्या काळात त्यांनी भ्रष्टाचार केला. त्यांनी बॉडीबॅग, खिचडीत पैसे खाल्ले. त्यामुळे आम्ही त्यांना कफनचोर म्हणायचे का? असा प्रश्न शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केला. तुम्हाला पुराव्याशिवाय बोलण्याचा अधिकार नाही. विरोधकांनी ज्या प्रकल्पांना विरोध केला त्या प्रकल्पांना आमच्या सरकारने चालना दिली. त्यामुळे त्यांना पोटदुखी सुरु झाली असून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, अशी टीकाही एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केली. (MLA Disqualification Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.