MLA Disqualification Case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी बातमी, ‘या’ दिवशी होऊ शकतो निर्णय

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर रविवारी (७ जानेवारी २०२४) चर्चा झाली. या चर्चेमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे.

533
MLA Disqualification Case : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठी बातमी, 'या' दिवशी होऊ शकतो निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांच्या अपात्रेचा (MLA Disqualification Case) निकाल तयार झाला आहे. १० तारखेला ४ वाजता निकाल जाहीर करण्याची शक्यता आहे. याच निकालावर दिल्लीतील तज्ज्ञांकडून अभिप्राय मागवण्यात आले आहेत अशी माहिती आहे.

(हेही वाचा – Shiv Sena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्ष पुढील आठवड्यात निर्णय देणार ?)

एकनाथ शिंदे यांनी जून २०२२ मध्ये बंड पुकारून भाजपशी युती केली आणि ते मुख्यमंत्री झाले. या घटनेनंतर उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि याचिका दाखल केली. त्यावर आता बुधवार १० जानेवारी रोजी निकाल (MLA Disqualification Case) जाहीर करण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. अशातच दोन्ही पक्ष आपल्या विजयाचा दावा करत आहेत. त्यामुळे निकाल कोणाच्या बाजूने लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – Corona JN.1 update : राज्यात JN.1 व्हेरियंटचे रुग्ण वाढत आहेत ; पुण्यात सर्वाधिक १५० रुग्ण)

राज्य सरकारचे अस्तित्व संपुष्टात येणार ?

एकनाथ शिंदे आणि त्यांचे १६ आमदार अपात्र ठरतील (MLA Disqualification Case) की नाही हे १० जानेवारी रोजी स्पष्ट होईल. आणि जर ते अपात्र ठरले तर राज्य सरकारचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे जर एकनाथ शिंदे पात्र असतील तर उद्धव ठाकरे यांचे आमदार अपात्र ठरतील का? किंवा त्याचा वेगळा परिणाम होईल का? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळातून उपस्थित केले जात आहेत. (MLA Disqualification Case)

(हेही वाचा – Terrorist Gurupatwant singh : खलिस्तानी दहशतवादी पन्नूने दिली ‘ही’ धमकी, म्हणाला अयोध्या ते…)

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात वर्षा बंगल्यावर रविवारी (७ जानेवारी २०२४) चर्चा झाली. या चर्चेमागील कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. (MLA Disqualification Case)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.