Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सुधारित वेळापत्रक सादर करणार ?

116
Rahul Narvekar : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सुधारित वेळापत्रक सादर करणार ?

गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटात पक्ष आणि निवडणूक चिन्हासाठी संघर्ष सुरू आहे. याप्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. मात्र यादरम्यान आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा (Rahul Narvekar) अध्यक्ष राहुल नार्वेकर दिरंगाई करत असल्याने ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष यांची कानउघाडणी केली.

नेमकं काय म्हणाले सर्वोच्च न्यायालय?

आज ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या याचिकांवर एकत्र सुनावणी (Rahul Narvekar) घेण्यात आली. या सुनावणी दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी किमान दोन महिन्यात निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी लवकरात लवकर एक वेळापत्रक तयार करावं असं सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी म्हटलं होतं. तसेच, विधानसभा अध्यक्षांना कोणीतरी सांगावं की, हे प्रकरण त्यांनी गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. पोरखेळ करताय का? असं म्हणत सरन्यायाधीशांनी अत्यंत कठोर शब्दांत राहुल नार्वेकर यांना सुनावलं होता.

दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी आपली भूमिका मांडली आहे. “संविधानाला मानणारे नागरिक म्हणून आम्ही न्यायालयाच्या प्रत्येक प्रक्रियेचं आणि निर्णयाचं पालन करू. मी सगळ्या न्यायालयांचा मान राखतो आणि सगळ्या न्यायालयाच्या आदेशांचं पालन करतो”, असं ते म्हणाले.

(हेही वाचा – Nithari Murder Case : आरोपी सुरेंद्र कोली, मोनिंदर पंढेर यांची उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता)

काय म्हणाले राहुल नार्वेकर?

“ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास असतो, संविधानावर विश्वास असतो त्यांनी संविधानाने (Rahul Narvekar) स्थापन केलेल्या विविध संस्थांचा मान राखणं, आदर ठेवणं आवश्यक आहे. मी संविधानाला मानणारा व्यक्ती असल्यामुळे मी नक्कीच कोर्टाच्या आदेशांचा आदर ठेवीन. पण विधिमंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे विधिमंडळाचं सार्वभौमत्व कायम ठेवणं हे माझं कर्तव्य आहे. विधिमंडळातील पीठासीन अधिकाऱ्यांचाही आदर राखणं तेवढंच आवश्यक आहे”, असंही राहुल नार्वेकरांनी नमूद केलं.

तसेच न्यायालयानं लेखी आदेश दिल्यास वेळापत्रकात बदल करू, अशी भूमिका विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.