Mizoram Election 2023 Result : मिझोराममध्ये सत्तापालट; झोराम पीपल्स मूव्हमेंट पक्षाला बहुमत

273
मिझोराम विधानसभा निवडणुकीचे निकाल (Mizoram Election 2023 Result )सोमवार, ४ डिसेंबर रोजी जाहीर झाले. झोराम पीपल्स मूव्हमेंट राज्यात सरकार स्थापन करणार आहे. झोराम पीपल्स मूव्हमेंट सध्या 27 जागांवर आघाडीवर आहे. सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटच्या 10 जागा कमी झाल्या आहेत. भाजप 2 जागांच्या आघाडीसह तिसर्‍या क्रमांकावर आहे, तर कॉंग्रेसची स्थिती अत्यंत बिकट असून ती केवळ 1 जागेवर घसरली आहे.
राज्यात विधानसभेच्या एकूण ४० जागा असून बहुमताचा आकडा २१ आहे. येथील मतमोजणी ३ डिसेंबर रोजी होणार होती, परंतु निवडणूक आयोगाने मिझोराममधील निकालाची तारीख बदलली. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून निवडणुकीची तारीख बदलण्याची मागणी केली होती. पत्रात म्हटले आहे की मिझो लोक रविवारी पूजा करण्यासाठी पूर्णपणे समर्पित आहेत.

(हेही वाचा BJP : एकाच वेळी दोन मुख्यमंत्र्यांचा पराभव करणारा भाजपचा तेलंगणातील कोण आहे ‘जायंट किलर’?)

निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार झोराम पीपल्स मूव्हमेंटने 27 जागा जिंकल्या आहेत. मिझो नॅशनल फ्रंटने 10 जागा जिंकल्या आहेत. तर भाजपने 2 जागा जिंकल्या आहेत.

27 जागा जिंकून पूर्ण बहुमत

झेडपीएमचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार लालदुहोमा म्हणाले, ‘मी उद्या किंवा परवा राज्यपालांना भेटेन. या महिन्यात नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. 40 सदस्यांच्या मिझोराम विधानसभेत झोरम पीपल्स मूव्हमेंटने 27 जागा जिंकून पूर्ण बहुमत मिळवले आहे. त्याच वेळी, सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटच्या 10 जागा कमी झाल्या आहेत.

ढोरम पीपल्स मूव्हमेंट कार्यालयात उत्सव

आयझॉलमधील झोरम पीपल्स मूव्हमेंट कार्यालयात उत्सव सुरू आहेत. कारण, राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाची पूर्ण तयारी आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.