Mewat violence : मेवातसारख्या दंगलींपासून रक्षणासाठी हिंदूंनी स्वसंरक्षण प्रशिक्षण घ्यावे – मेजर सरस त्रिपाठी

84

हरियाणातील मेवातमध्ये दंगल होण्यापूर्वी हिंसाचाराचे साहित्य, शस्त्रात्रे जमा होत होती, तेव्हा येथील पोलीस-प्रशासनाला याचा सुगावा कसा लागला नाही? मेवातमध्ये पोलीस बंदोबस्त कुठे होता? आज हिंदू नि:शस्त्र आहेत. शीख बांधवांना स्वतःचे रक्षण करण्यासाठी ‘कृपाण’ सोबत बाळगण्याची अनुमती आहे. मेवातसारख्या दंगलीत स्वत:चे रक्षण करण्यासाठी हिंदूंनी शस्त्रांचे प्रशिक्षण घ्यायला हवे. हिंदूंनी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करण्याची मागणी केली पाहिजे. या हिंदु राष्ट्रात हिंदूंवर अत्याचार होणार नाहीत, धर्मातराला बंदी असेल आणि सनातन हिंदु धर्माचे रक्षण केले जाईल, असे प्रतिपादन ‘प्रज्ञा मठ पब्लिकेशन’चे लेखक आणि (सेवानिवृत्त) मेजर सरस त्रिपाठी यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित ‘मेवात कि मिनी पाकिस्तान?’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होेते.

सरस त्रिपाठी पुढे म्हणाले की, मेवातच्या दंगलीत रोहिंग्यांचा सहभाग होता. म्यानमारमधून पळवून लावल्यावर ते बांगलादेशमार्गे आले आणि प्रथम बंगाल मग बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, काश्मीर, हरियाणा आदी वेगवेगळ्या ठिकाणी वसवण्यात आले आहे. त्यांना घर, पाणी, आधारकार्ड उपलब्ध करून दिले जात आहे. केंद्र सरकारने या रोहिंग्यांना बंदिवास शिबिरांमध्ये ठेऊन म्यानमारला पाठवून दिले पाहिजे. ‘बजरंग दला’चे हरियाणा प्रांत सुरक्षा प्रमुख कृष्ण गुज्जर म्हणाले की, मेवातमधील दंगलीची तयारी गेल्या 1 महिन्यापासून चालू होती. या दंगलीत रोहिंग्यांसह स्थानिक मुसलमानांचा सहभाग होता. मेवातमध्ये एकूण 102 गावे हिंदूविहीन झाली आहेत. आता येथील उरलेल्या हिंदूंनीही पलायन करावे का? मेवातमध्ये काही ठिकाणी बुलडोझर चालवून हिंदूंना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र जोपर्यंत दंगलीत सहभागी असलेल्या सर्वांच्या घरांवर बुलडोझर चालवून दंगलखोरांवर कठोर कारवाई केली जात नाही, तोपर्यंत या दंगलीत हिंदूंची सुरक्षा करत बलिदान दिलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या आत्म्याला शांती मिळणार नाही.

(हेही वाचा Bhalchandra Nemade : हिंदूद्वेषी नेमाडेंनी ज्ञानपीठ पुरस्काराचा अपमान केला – कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजी आंग्रे)

सोनीपत (हरियाणा) येथील विहिंपच्या जिल्हा मातृशक्ती संयोजिका पिंकी शर्मा म्हणाल्या की, मेवातमध्ये आम्ही मंदिरात केवळ दर्शनासाठी गेलो असतांना हिंदूंवर आक्रमणे करण्यात आली. यामध्ये आक्रमणकर्त्यांनी लहान मुले, वुद्ध आणि महिलांनाही सोडले नाही. हिंदूंचे मंदिरात जाणे आणि रामनाम घेणे त्यांना सहन होत नाही; मात्र हिंदूंनी दिवसांतून 5 वेळा भोंग्यांद्वारे ‘अल्ला-हू-अकबर’च्या घोषणा ऐकायच्या ? येणारा काळ हिंदूंसाठी कठीण आहे. मेवातमध्ये हिंदूंच्या अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्या आहेत. सरकार हिंदूंची सुरक्षा करू शकत नाही. त्यामुळे हिंदूंनी ‘सेक्युलरवादा’तून बाहेर येऊन आता जागृत झाले पाहिजे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.