Hindu Mahasabha : हिंदू महासभेची रायगड जिल्ह्यात सभा; कार्य खेडोपाडी पोहचवण्याचे ध्येय

123

हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha) रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात पक्ष प्रवेशाच्या निमित्ताने प्रकट सभेचे आयोजन रविवारी, १० सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. या प्रसंगी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. त्यावेळी हिंदू महासभेचे वरिष्ठ राष्ट्रीय अुपाध्यक्ष दिनेश भोगले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात, हिंदू महासभेची आवश्यकता प्रतिपादित करताना हिंदुत्वाची व्याख्या विशद केली. राष्ट्राची संकल्पना स्पष्ट करताना ते म्हणाले की, ज्या व्यक्ती समुहाला छत्रपती शिवरायांचा इतिहास आपला वाटतो, काशी, मथुरा, पंढरपूर ही तीर्थस्थाने आपली वाटतात, जो व्यक्ती समुह आपल्या मातृभूमीला संपूर्ण निष्ठा अर्पण करतो, अशा व्यक्ती समुहाचे राष्ट्र बनते. छत्रपती शिवरायांनी या रायगडावर हिंदवी स्वराज्याचे तोरण बांधले, त्या रायगड जिल्ह्यात आपल्याला हिंदुत्वाचे तोरण बांधण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही पहा – 

हिंदू महासभा (Hindu Mahasabha) खेडोपेडी पोहोचविण्याचे कार्य तडीस नेण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र प्रदेशचे आहे. त्या उद्दीष्टाची पूर्ती करण्याच्या प्रयत्नांचा आरंभ आज होत असल्याचे प्रतिपादन प्रदेश उपाध्यक्ष अनुप केणी यांनी केले. ते रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुक्यातील कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. देशात हिंदुत्व जर मजबूत करायचे असेल तर हिंदुमहासभा एकमेव विकल्प आहे आणि त्यासाठी हिंदू महासभा गावोगावी पोहचवावी लागेल, तेव्हाच हा विकल्प निर्माण होऊ शकतो. हिंदू महासभेचे संघठन बळकट करणे, ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले.

(हेही वाचा Uddhav Thackeray : “उद्धव ठाकरेंना आपल्याच आमदारांची मराठी भाषा समजली नाही”; असे का म्हणाले अतुल भातखळकर?)

हरिश शेलार म्हणाले की, महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती अत्यंत अस्थिर झाली आहे,  प्रस्थापित राजकीय पक्षांचे नेते सत्ताधारी बनण्यासाठी आपल्या  पक्षांच्या धोरणांना मुठमाती देत आहेत. लोकसभेेच्या निवडणुक जिंकण्याच्या हव्यासापोटी भाजप नेतृत्व भष्टाचाराचे आरोप असणाऱ्या विरोधी पक्षाला सत्तेत सहभागी करुन घेत असताना जनमताची चाड ठेवताना दिसत नाही. राज्यात जातीपात, आरक्षणाच्या बिंदूवरुन राजकारण तापले असून जाती जातींमध्ये तेढ निर्माण होत असताना, एकसंघ समाज निर्माण करण्याची आवश्यकता आहे. जातपात विरहित हिंदू समाज निर्माण करण्याची ताकद हिंदुत्वात आहे, म्हणुन हिंदुत्व बळकट करण्याचे आपल्यावरील दायित्व आपण पार पाडले पाहिजे, असे ते म्हणाले.

रायगड जिल्ह्यात हिंदू महासभेच्या (Hindu Mahasabha) प्रकट सभेची सुरुवात हिंदू ध्वज गीताने झाली. सभेचे प्रास्ताविक  जिल्हाध्यक्ष मधुकर खामकर यांंनी केले. प्रास्ताविकात त्यांनी जिल्ह्यातील हिंंदू महासभेच्या संघटनात्मक कार्याची माहिती दिली. हे कार्य करत असताना आपणास नविन कृतिशील कार्यकर्ते संपर्क करत असल्याचे ते म्हणाले. रायगड जिल्ह्यात हिंदू महासभेचे (Hindu Mahasabha) संघटन शक्तिशाली होण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करु, अशी ग्वाही त्यांनी दिली. विलास धामणसे आणि अन्य मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. संपूर्ण वंदे मातरम्  गीत गायनाने सभेची सांगता हरिश शेलार यांनी केली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.