Epidemic Diseases : वातावरणातील बदलामुळे मुंबईसह राज्यात साथींचं प्रमाण वाढलं, कोरोना रुग्णसंख्येतही वाढ

29
Epidemic Diseases : वातावरणातील बदलामुळे मुंबईसह राज्यात साथींचं प्रमाण वाढलं, कोरोना रुग्णसंख्येतही वाढ
Epidemic Diseases : वातावरणातील बदलामुळे मुंबईसह राज्यात साथींचं प्रमाण वाढलं, कोरोना रुग्णसंख्येतही वाढ

मुंबईप्रमाणेच राज्यांच्या विविध भागांना साथीच्या आजारांचा विळखा बसला आहे. ताप, सर्दी, खोकला, डोळे येण्याची साथ आणि इन्फ्लुएन्झा या आजारांचा त्रास अनेकांना होत आहे. वातावरणातील बदल आणि विषाणूंचा संसर्ग वाढल्यामुळे तापाचे रुग्णही वाढत आहेत.

कोरोना संसर्ग रुग्णांची संख्याही राज्यात वाढत आहे. 9 सप्टेंबरपर्यंत उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या 202 एवढी नोंदवण्यात आली आहे. घरगुती विलगीकरणामध्ये 180 रुग्ण असून, रुग्णालयामध्ये 22 रुग्ण दाखल आहेत. अतिदक्षता विभागामध्ये 12 रुग्ण दाखल असून आयसीयूमध्ये त्यापैकी 10 रुग्ण उपचार घेत आहेत. 14 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यात 116 रुग्णांची नोंद झाली होती, तर 28 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर यादरम्यान 195 असलेली संख्या 4 ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये 214 इतकी झाली आहे. मुंबईमध्ये कोरोनाचे 110 रुग्ण असून ठाण्यात कोरोनाचे 60 रुग्ण आढळून आले आहेत.

1 जून ते 9 सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात एच1 एन1 या संसर्गाच्या 322 रुग्णसंख्येची नोंद झाली असून, एच 3 एन 2 या संसर्गाचे 1196 रुग्ण नोंदवण्यात आले आहेत.आतापर्यंत या दोन्ही प्रकारचे 1518 रुग्ण आढळले आहेत. 1 जानेवारी ते 31 मे या कालावधीत इन्फ्लुएन्झाची 537 रुग्णसंख्या नोंदवण्यात आली आहे. एच३एन२च्या ५१८ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. या दोन्ही प्रकारांतील १०५५ रुग्ण आढळून आले आहेत.रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासाठी राज्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये तसेच वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयात विलगीकरणाची सोय करण्यात आली आहे.या आजारात मृत पावलेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी मृत्यू विश्लेषण समिती स्थापन करण्यात आली आहे.

डोळ्यांची साथ नियंत्रणात नाही

डोळे येण्याची साथ अद्याप नियंत्रणात आली नसून, राज्यात ५ लाख ५० हजार ४४२ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. पुणे येथे ५२,५२३ तर बुलढाणा येथे ४९,८९३ जळगावमध्ये २९,८५६ रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. मुंबईमध्ये ६९३५ जणांना हा त्रास झाला आहे.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.