Maratha Reservation : छगन भुजबळांचे मनोज जरांगे पाटलांना आव्हान; म्हणाले…

१६ तारखेपर्यंत मराठा आरक्षणावरील अधिसूचनेवर हरकती नोंदवायच्या आहेत. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, कारण कॅबिनेटमध्ये ठरलेले विषय असतात, अजेंडा असतो. त्यानुसार कॅबिनेट चालते, माझा अजेंडा ओबीसी बचाव हा आहे, असे भुजबळ म्हणाले.

253

राज्य सरकारने मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तातडीने अधिसूचना काढून मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या पूर्ण केल्या, त्यामुळे मराठा मोर्चा मुंबईपर्यंत न पोहचता तो वाशीतच विसर्जित झाला. मात्र त्यानंतर आता छगन भुजबळ यांनी याला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. भुजबळ आता जरांगे पाटलांना आव्हान देऊ लागले आहेत. जरांगे पाटलांनी हिंमत असेल त्यांनी मंडल आयोगाला आव्हान द्यावे, असे भुजबळ म्हणाले.

(हेही वाचा Narendra Modi: खासदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा लाभ घ्यावा आणि सकारात्मक पाऊल टाकावे – पंतप्रधान)

काय म्हणाले भुजबळ? 

मराठा समाजाचे जे जाणकार आहेत त्यांचे म्हणणे आहे की त्यांना वेगळे आरक्षण द्या, कुणबी म्हणून देऊ नका. मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) कायदा बनलेला आहे. त्यातील त्रुटी दूर करण्याचे काम सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करण्यात आली आहे. मात्र तरीही मागच्या दाराने कुणबी प्रमाणपत्रे देण्याचे काम सुरू आहे. या झुंडशाहीपुढे नमते घेऊन जो कार्यक्रम सुरू आहे, त्याला आमचा विरोध आहे. तुम्ही कुणाला कितीही आरक्षण (Maratha Reservation)द्यावे पण ओबीसींच्या आरक्षणाला का धक्का पोहचवता? ओबीसी नेत्यांची २ दिवसांपूर्वी बैठक झाली. राज्यभरात ओबीसी एल्गार कार्यक्रम ठरलेला आहे. १६ तारखेपर्यंत या अधिसूचनेवर हरकती नोंदवायच्या आहेत. कॅबिनेटमध्ये चर्चा झाली, कारण कॅबिनेटमध्ये ठरलेले विषय असतात, अजेंडा असतो. त्यानुसार कॅबिनेट चालते, माझा अजेंडा ओबीसी बचाव हा आहे, असेही भुजबळ म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.