Maratha Reservation : भूजबळांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही; एनसीपीचे नेतेही सहमत नाहीत – संजय गायकवाड

जो जीआर निघाला तो जरांगे पाटील यांच्या सांगण्यानुसार निघालाय, सगळ्या प्रक्रिया पुर्ण होतील… ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत, वेगळ्या आरक्षणाची त्यांना गरज नाही, ते ओबीसीच आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळायला हवं.

162
Maratha Reservation : भूजबळांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही; एनसीपीचे नेतेही सहमत नाहीत - संजय गायकवाड
Maratha Reservation : भूजबळांच्या भूमिकेशी सरकार सहमत नाही; एनसीपीचे नेतेही सहमत नाहीत - संजय गायकवाड

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी घेतलेली भूमिकेशी सरकार सहमत नाही तर एनसीपीचे (NCP) नेते देखील सहमत नाहीत. भूजबळ जो तिरस्कार करतात ते योग्य नाही, मुख्यमंत्री साहेब भूजबळ यांची हकालपट्टी करा, कशाला लाड करता, याला आधी बाहेर काढा, मंत्रीपदाची शपथ घेताना सरकारच्या विरोधात काम करणार नाही याची शपथ भूजबळ यांनी घेतलीये. अशी मागणीच सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी माध्यमांसमोर बोलून दाखवली. (Maratha Reservation)

(हेही वाचा – Ind vs Eng 2nd Test : राहुल, जडेजाच्या दुखापतीमुळे भारतीय संघासमोर संघ निवडीचा प्रश्न)

मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे

जो जीआर (GR) निघाला तो जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या सांगण्यानुसार निघालाय, सगळ्या प्रक्रिया पुर्ण होतील… ५७ लाख नोंदी सापडल्या आहेत, वेगळ्या आरक्षणाची त्यांना गरज नाही, ते ओबीसीच (OBC) आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळायला हवं. (Maratha Reservation)

ज्या मराठ्यांनी हा देश वाचवला त्यांच्या विरोधात भूमिका घेणे योग्य नाही. सरकार भुजबळांना मंत्रीमंडळातून काढणार नाही, एका मंत्र्याच्या विरधाने सरकारला फरक पडत नाही, मी खुलेआम सांगतोय. त्यांच्या राजीनाम्याने ना सरकारला फरक पडत ना एनसीपीला. (Maratha Reservation)

सगेसोयरे बाबात अधिसुचना १६ फेब्रुवारीला निघेल तो पर्यंत जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दम धरावा. आंदोलन करू नये , सरकार सकारात्मक आहे. (Maratha Reservation)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.