Manoj Jarange : ‘ते’ विधान अंगलट येताच जरांगेंनी शब्द घेतला मागे

भुजबळांनी केलेल्या टीकेनंतरही जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला होता. मात्र, त्यानंतर आता त्यांचे विधान अंगलट येताच जरांगे यांनी आपले विधान मागे घेतले आहे. तर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर लायकी शब्द मागे घेतोय, असं म्हणत जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला.

57
Manoj Jarange : 'ते' विधान अंगलट येताच जरांगेंनी शब्द घेतला मागे
Manoj Jarange : 'ते' विधान अंगलट येताच जरांगेंनी शब्द घेतला मागे

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अखेर लायकी शब्द मागे घेतला आहे. पुण्यातील खराडीत झालेल्या जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी “लायकी नसलेल्यांच्या हाती काम करावं लागतंय” असे आक्षेपार्ह विधान करून चौफेर टीका केली होती. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे नवं वादंग निर्माण झालं होतं. त्यानंतर रविवारी झालेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून छगन भुजबळांनी जरांगेंवर सडकून टीका केली. भुजबळांनी केलेल्या टीकेनंतरही जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला होता. मात्र, त्यानंतर आता त्यांचे विधान अंगलट येताच जरांगे यांनी आपले विधान मागे घेतले आहे. जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर लायकी शब्द मागे घेतोय, असं म्हणत जरांगेंनी लायकी शब्द मागे घेतला. (Manoj Jarange)

(हेही वाचा : Maharashtra Seva Sangha: महाराष्ट्र सेवा संघातर्फे ‘किल्ले प्रतिकृती बांधणी स्पर्धा – २०२३’चे आयोजन)

माझा म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता
माझं म्हणण्याचा उद्देश तसा नव्हता, कारण मी कधीही जातीयवाद करत नाही आणि कधीही केलेला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश आणि अर्थ वेगळा होता, पण विनाकारण काहीजण त्याला जातीयरंग देण्याचा प्रयत्न करायला लागले. परंतू आमचं मराठा आरक्षणापासून ध्येय हटणार नाही. तरीही काहीजणांचा जर गैरसमज होऊ नये म्हणून मी तो शब्द मागे घेतो, असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे. (Manoj Jarange)

नेमके काय म्हणाले जरांगे
पुण्यातील खराडी इथंल्या सभेत जरांगे म्हणाले होते की, “95 टक्के पडले तरी, मराठ्याचं लेकरु घरी राहिलं, त्याला नोकरी मिळाली नाही. हेच आरक्षण 70 वर्षांपूर्वी मिळालं असतं तर, मराठा जात जगात एक नंबरवर राहिली असती. ज्याची लायकी नाही त्याच्या हाताखाली काम करायची वेळ आली नसती. आरक्षणापायी आमच्या मुलांचे मुडदे पडायला लागले आहेत, त्यामुळं आता सरकारला सुट्टी नाही.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.